Independence Day 2022 Delhi massive arrangements Parliament and Rashtrapati Bhavan police security implemented article 144  esakal
देश

Independence Day 2022 : स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली बनली छावणी जागोजागी महाप्रचंड बंदोबस्त

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा खास बनविण्यासाठी प्रशासनाबरोबरच दिल्ली पोलिस व सुरक्षा दलांनीही जोरदार तयारी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा खास बनविण्यासाठी प्रशासनाबरोबरच दिल्ली पोलिस व सुरक्षा दलांनीही जोरदार तयारी केली आहे. संपूर्ण दिल्लीत कलम १४४ जारी करण्यात आले असून संसद भवन व राष्ट्रपती भवनासह महत्वाच्या परिसरात ठिकठिकाणी सशस्त्र पोलिसांचा जागता पहारा सुरू आहे. तब्बल १० हजार पोलिस, निमलष्करी व लष्करी जवानांनी दिल्लीत डोळ्यात तेल घालून पहारा सुरू केला आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळयातही सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाचे आरोग्य नियम काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.

दरम्यान स्वातंत्र्यदिनाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणे सुरू असतानाच आनंद विहार परिसरात तब्बल २००० काडतुसे व शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली. या शस्त्रसाठ्याचा दहशतवाद्यांशी थेट संबंध असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळले नाही. तरीही सुरक्षा व पोलिस यंत्रणा या प्रकारानंतर आणखी सावध झाल्या आहेत.
विशेषतः लाल किल्ला परिसराला तर छआवणीचेच स्वरूप आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी (ता.१५) सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करतील तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी सात पदरी सुरक्षा व्यवस्था असेल व त्याचीही रंगीत तालीम (मॉक ड्रील) पुन्हा पुन्हा सुरू आहे. पोलिस, निमलष्करी दले व लष्कराचे हजारो जवान, हवाई दल व लष्कराच्या यंत्रणाही सज्ज आहेत. लाल किल्ल्यावरील झेंडावंदन व मोदी यांचे भाषण, या कार्यक्रमास शालेय मुलांसह ७ हजार विशेष आमंत्रितांना विशिष्ट टॅगसह आमंत्रणपत्रे रवाना करण्यात आली आहेत. दिल्ली गेटपासून चांदनी चौक, दरियागंज, जामा मशीद या संपूर्ण परिसरातील बंदोबस्त आजपासूनच वाढविण्यात आला असून ठिकठिकामी ४०० काईट कॅचर तैनात करण्यात आली आहेत. लाल किल्ल्याचा ५ किमीचा परिसर ‘नो काईट फ्लाईट झोन' असेल.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याच्या परिसरात अँटीड्रोन सिस्टिम आणि अन्य यंत्रणाही तैनात करण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वारावर एफआरएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. लाल किल्ला ते शीशगंज गुरूद्वारा व गौरीशंकर मंदिरापासून फतेहपुरी मशिदीपर्यंत हाय रिझॉल्यूशन कॅमेरे जवानांसोबतच पहारा देतील. स्वातंत्र्यदिन सोहळ्यावेळी जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या, रिमोट कंट्रोल्ड कारच्या चाव्या, लायटर, ब्रीफकेस, हॅंडबॅग, कॅमेरे, दुर्बिणी आणि छत्र्या आणण्यास मनाई असेल. या ५ किलोमीटर परिसरातील शुक्रवार बाजार, अजमेरी गेट भागातील बाजार, गालिब इन्स्टिट्यूट परिसरातील सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे. दिल्लीत आजपासून १५ आॅगस्टचा दिवस पार पडेपर्यंत पावलापावलावर पोलिस यंत्रणांची तीक्ष्ण नजर राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: १९९६ चा खटला… दिवंगत बापासाठी मुलगी लढली अन् न्याय मिळून दिला, माणिकराव कोकाटेंविरोधात लढलेल्या ॲड. अंजली दिघोळे...

ICC T20I Rankings: वरूण चक्रवर्थीने मोडला पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम; आता टार्गेटवर शाहिद आफ्रिदी...

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

Leopard Attack : बिबट्यापुढे धाडसी मातेचे शौर्य ठरले व्यर्थ; डोळ्यांदेखत पोटच्या गोळ्याला नेले फरपटत; हंबरड्याने पाणावले उपस्थितांचे डोळे

NASA Scientist Salary: NASA मध्ये संशोधन शास्त्रज्ञाला किती पगार मिळतो; जाणून घ्या सुविधा काय आहेत?

SCROLL FOR NEXT