Independence Day in Kashmir sakal
देश

Independence Day in Kashmir : श्रीनगर येथील लाल चौकात नागरिकांनी फडकवले तिरंगा ध्वज

आज देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे.

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर : आज देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. सगळेजण आज आपल्या जवळच्या सरकारी कार्यालये, शाळा किंवा संस्थेच्या कार्यालयातील ध्वजारोहणासाठी उपस्थित राहत असतात. भारतीय नागरिकांसाठी हा सुखसोहळा आहे. जम्मू काश्मिरातील श्रीनगर येथील लाल चौकात नागरिकांचा उत्साह पाहायला मिळत असून नागरिकांनी तिरंगा फडकावला आहे.

श्रीनगरमधील लाल चौकातील नागरिकांचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये नागरिक आनंदात तिरंगा ध्वज फडकावताना दिसत आहेत. देशभक्तीपर गितांनी लाल चौकाचा परिसर दणाणून गेला आहे.

दरम्यान, आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे पूर्ण झाली असून दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वजारोहण करतील आणि देशवासियांना संबोधित करतील. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या मंत्रालयात ध्वजारोहण करणार आहेत.

लाल किल्ल्यावर परेड बघण्यासाठी नागरिकांची गर्दी जमा झाली आहे. जी२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ला परिसरामध्ये सजावट करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT