Independence Day 2023  esakal
देश

Independence Day : लाल किल्ल्याजवळ पुरण्यात आलेले टाइम कॅप्सूल म्हणजे काय? वर्षानुवर्षे यावर चाललाय वाद

जाणून घ्या काय असते टाइम कॅप्सूल

साक्षी राऊत

Independence Day Special Time Capsules History : लाल किल्ल्यावर कायम एक टाइम कॅप्सूल पुरण्यात आल्याची चर्चा असते. हे कॅप्सूल यासाठी ठेवण्यात आलंय जेणेकरून शेकडो- हजारो वर्षांनंतरच्याही पिढ्यांना आपल्या भारताचा इतिहास माहिती असावा.

टाइम कॅप्सूल अजूनही अनेक ठिकाणी पुरण्यात आलेलं आहे. हे कल्पना फार जुनी असली तरी त्यावर वादविवाद अजूनही सुरु आहेत. इतिहासाचा सखोल अभ्यास असणारे तज्ज्ञ यावर म्हणतात की राजकीय समुह यावर त्यांच्या सोयीप्रमाणे खरीखोटी माहिती देऊ शकतात.

कधी तिसरे महायुद्ध झाले आणि संपूर्ण जग नष्ट झाले तर माहितीचा स्त्रोत काय असेल? अलीकडे एक्सपर्ट्स जमिनीचे खोदकाम करून हेसुद्धा माहिती करून घेतात की हजारो वर्षांआधी लोकांची जीवनशैली आणि त्यांचे खाणेपिणे कसे होते. मात्र टाइम कॅप्सूल याची मॉर्डन पद्धत आहे. शेकडो वर्षे जमिनीच्या आत राहूनही हे कप्सूल खराब होत नाही. आणि यात असलेली माहितीसुद्धा सुरक्षित राहील. जाणून घ्या काय असते टाइम कॅप्सूल.

कसे असते टाइम कॅप्सूल?

हा एकप्रकारचा बॉक्स आहे जो कुठल्याही आकाराचा असू शकतो. हे अॅल्युमिनियम, स्टील किंवा तांब्यापासून बनवले जाते जेणेकरून जमिनीत पुरल्यानंतरही जास्त काळ टिकून राहील. तसेच यात लिखित माहिती अॅसिड फ्री पेपरवर असते. ज्यामुळे ती हजारो वर्षांपर्यंत जशीच्या तशी राहते.

या कॅप्सूल टाइम सेट करूनही पुरल्या जाऊ शकतात

कॅप्सूलचा डबा तीन फूट किंवा त्यापेक्षाही लांब असू शकतो. जो जमिनीत फार खोलवर पुरला जातो. जमिनीत खोलवर पुरण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे हजारो वर्षानंतरही ही माहिती सुरक्षित असवी. बहुतेकदा हे कॅप्सूल परत जमिनीतून कधी काढले जाईल याचा वेळ निश्चित करून आणि शेड्युल करून जमिनीत पुरल्या जाते. (Independence day)

भारतात किती टाइम कॅप्सूल आहे?

भारतात याला कालपत्र असेही म्हणतात. सगळ्यात आधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत ऑगस्ट १९७२ मध्ये टाइम कॅप्सूल लाल किल्ल्याजवळ पुरण्यात आले होते. जमिनीत ३० फूट खोलवर पुरण्यात आलेल्या या कॅप्सूलबाबत असे म्हटले जाते की, या सातंत्र्यानंतरच्या २५ वर्षांच्या काळाचा इतिहास या कॅप्सूलमध्ये आहे.

मात्र या विषयावर कायम वादविवाद होताना दिसतो. अनेक राजकीय समुहांचा असा आरोप आहे की या कालपत्रात एक पार्टी आणि एक कुटुंब यांच्या कौतुकाव्यतिरिक्त दुसरं काहीच नसणार. देशाच्या इतिहासाचा यात अजिबात उल्लेख नसावा. असेही काही राजकीय नेत्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT