देश

Video : इंडिया आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जी जाणार नाहीत; म्हणाल्या, मला काहीच माहिती नाही...

संतोष कानडे

नवी दिल्लीः येत्या ६ तारखेला इंडिया आघाडीची पुढची बैठक होणार आहे. काँग्रेसने याबाबत घोषणा केली आहे. मात्र तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी बैठकीला जाणार नसल्याचं म्हटलंय. त्याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल मला काहीही माहिती नाही. आम्ही उत्तर बंगालमध्ये सहा-सात दिवस कार्यक्रम ठेवला आहे. त्यामुळे आम्ही त्यासाठी जात आहोत. मला याबद्दल माहिती असती तर नक्कीच बैठकीला गेले असते. परंतु त्याबद्दल आम्हाला काहीही माहिती देण्यात आलेली नाहीये.

मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत ममता बॅनर्जी ह्या रागाने निघून गेल्या होत्या. खुद्द शरद पवार यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केलेला. मात्र त्या निघून गेल्या. इंडिया आघाडीने जाहीर केलेल्या समन्वय समितीमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या नावाचा समावेश आहे. ६ डिसेंबरच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी होणार नाहीत, हे स्पष्ट होत आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला पर्याय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशातील तब्बल २६ पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, टी.एम.सी असे २६ पक्ष एकत्र आले आहेत. या विरोधी पक्षांच्या युतीला 'इंडिया आघाडी' असे नाव देण्यात आले आहे.

काँग्रेसने इंडिया आघाडीची पुढची बैठक ६ डिसेंबर रोजी दिल्ली येथे बोलावली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या बैठकी संदर्भातली माहिती आपल्या सोबतच्या राजकीय पक्षांना दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

Bigg Boss Marathi 6 Live Update: लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अनुश्री मानेची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

SCROLL FOR NEXT