Sanjay Raut Esakal
देश

INDIA Alliance : इंडिया आघाडीच्या बैठका आता थांबणार! संजय राऊतांनी दिली मोठी अपडेट

शरद पवार यांच्या निवासस्थानी समन्वय समितीची लवकर बैठक पार पडणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

New Delhi News : विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठका आता थांबणार असल्याची महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. भोपाळ, कलकत्ता इथं बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, समन्वय समिती नेमल्यानंतर या बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. (INDIA Alliance meetings will stop now Big update given by Sanjay Raut)

राऊतांनी काय म्हटलंय?

संजय राऊत म्हणाले, "१३ सप्टेंबर २०२३ रोजी शरद पवारांनी त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी समन्वय समितीची बैठक बोलावली आहे. या बैठका आता यापुढं सुरु राहतील त्याप्रमाणं आम्ही काम करु"

बैठकांबाबत नेमकं काय ठरलंय?

इंडिया आघाडीच्या आजवर तीन बैठका पार पडल्या आहेत. पाटणा, बंगळुरु आणि मुंबईत अशा अनुक्रमे या बैठका झाल्या. यानंतर पुढच्या बैठका या दिल्ली, भोपाळ, चेन्नई किंवा कोलकाता इथं होतील. पण शेवटच्या मुंबईतील बैठकीत ज्या विविध समितीत्यांची स्थापना झाली. याच समित्या यापुढं बैठका घेणार आहेत.

मोठ्या बैठका आता होणार नाहीत. या समित्यांपैकी महत्वाची समिती म्हणजे समन्वय समिती आहे. या समितीतील वरिष्ठ सदस्य आहेत शरद पवार. त्यामुळं येत्या १३ सप्टेंबरला शरद पवार यांनी आपल्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे.

समन्वय समितीच्या बैठकीचा अजेंडा काय?

पवारांनी बोलावलेल्या १३ सदस्यांच्या समन्वय समितीच्या बैठकीत इंडिया आघाडीचा एकत्रित प्रचार, सभा तसेच जागा वाटप कशा पद्धतीनं करायच्या याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळं यापुढील काळात आघाडीच्या कामांना गती येणार आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT