नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोगबानी-बिरातनगर संयुक्त तपासणी चौकीचे उद्‌घाटन केले. 
देश

मित्रदेशांबरोबरील वाहतूक अधिक सोईस्कर करण्याचा भारताचा नेहमीच प्रयत्न

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - शेजारील सर्व मित्रदेशांबरोबरील दळणवळण अधिक सुविधाजनक करण्यासाठी त्याद्वारे व्यापार वाढविण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी आज भारत-नेपाळ सीमेवरील जोगबनी-बिरतनगर या दुसऱ्या सर्वसमावेशक तपास नाक्‍याचे उद्‌घाटन केले.

हा तपास नाका भारताच्या साह्याने बांधण्यात आला आहे. मोदी आणि ओली यांनी अनुक्रमे नवी दिल्ली आणि काठमांडूमधून व्हिडिओ लिंकद्वारे या तपास नाक्‍याचे उद्‌घाटन केले. या तपास नाक्‍यामुळे भारत आणि नेपाळमधील व्यापार वाढण्याबरोबरच जनतेचा संवादही वाढीला लागेल, असा विश्‍वास दोन्ही बाजूंकडून व्यक्त झाला आहे. भारत-नेपाळ सीमेवर पहिला सर्वसमावेश तपास नाका रक्‍सौल-वीरगंज येथे २०१८ मध्ये उभारण्यात आला आहे.

उद्‌घाटनानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले,‘‘मित्रदेशांबरोबरील वाहतूक अधिक सोईस्कर आणि सुविधाजनक करण्याचा भारताचा नेहमीच प्रयत्न असतो. या देशांबरोबर व्यापार, संस्कृती आणि शिक्षणातही आदान-प्रदान वाढविण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. भारत आणि नेपाळ सीमेवर रस्ते, रेल्वे आणि इतर विविध मार्गांनी दळणवळण वाढविण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील आहेत.’’ नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतर भारताने गोरखा आणि नुवाकोट जिल्ह्यांमध्ये ५० हजार घरे बांधून देण्याचे आश्‍वासन नेपाळला दिले होते. यापैकी ४५ हजार घरे बांधून झाली असल्याचे मोदी यांनी सांगितले. ओली यांनी मोदी यांना आपल्या देशात येण्याचे निमंत्रण दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Farmers: पीकविमा योजनेत डिजिटल सर्वेक्षण बंधनकारक, चार प्रमुख बदल; फसवणूक केल्यास ५ वर्षे कोणताच लाभ नाही

Satara: कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार! धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक; १२ तासात ७८७ मिमी पाऊस

Cabinet Reshuffle: ते दोन केंद्रीय मंत्री कोण? भाजप कार्यालयात पोहोचताच राजीनाम्याच्या चर्चांना उधाण

Marathi Live Updates : सुकळी खिंडीत पाण्याचा महासागर; गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

नागपुरात एकाच कुटुंबातील ५ जण बेपत्ता, शेवटचं लोकेशन पुणे; १० दिवसांपासून शोध सुरू

SCROLL FOR NEXT