India Bangladesh Visit Sakal
देश

भारत-बांग्लादेशमध्ये उच्चस्तरीय बैठक; परराष्ट्रमंत्री म्हणाले...

भारत आणि बांग्लादेशमध्ये गुरुवारी उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे.

दत्ता लवांडे

ढाका : भारत आणि बांग्लादेशमध्ये गुरुवारी उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी गुरुवारी बांग्लादेशचे समकक्ष डॉ. ए.के. अब्दुल मोमेन यांची भेट घेत बांग्लादेशच्या पंतप्रधान शेखा हसिना यांच्याशी चर्चा केली आहे. दोन्ही देशांच्या मैत्री दौऱ्यातील बैठक ढाका झाली आहे. परराष्ट्र सचिव-नियुक्त विनय मोहन क्वात्रा हेसुद्धा या चर्चेदरम्यान उपस्थित असणार आहेत. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये इंधनाच्या वाढत्या भावामुळे परिणाम झाला असून संयुक्त राष्ट्रामध्ये झालेल्या बैठकीत दोन्ही देशांनी सावधपणे मतदान केलं होतं.

"बांग्लादेशच्या डॉ. ए.के. अब्दुल मोमेन यांच्यासोबत साकारात्मक चर्चा झाली. भारत आणि बांग्लादेशच्या संबंधातून सातत्याने प्रगती करण्यावर त्यांनी सहमती दर्शवली आहे. त्यासाठी दोन्ही देशांकतील भागीदारी पुढे नेण्यासाठी आमचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी आम्ही चर्चा करायला तयार आहोत असं ते म्हणाले आहेत." असं परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितलं.

या भेटीदरम्यान जयशंकर यांनी पंतप्रधान मोदींचा संदेश बांग्लादेशच्या पंतप्रधान शेखा हसीना यांच्यापर्यंत पाठवला. तसेच युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या निर्बंधामुळे दोन्ही देशांनी व्यापार, वाणिज्य आणि दळणवळणावर भर दिला असून भारताने कोरोनाच्या काळात बांग्लादेशला मदत केली असल्याची माहिती बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात दिली आहे.

दरम्यान या भेटीमध्ये न्यायबाह्य हत्येचा आरोप असलेल्या रॅपिड अॅक्शन बटालियन (RAB) वर संयुक्त राष्ट्रांनी लादलेले निर्बंध उठवण्यात मदत करण्याची मागणी भारताकडे केली होती. त्यानंतर हा मुद्दा मीडियामध्ये चर्चेच आला होता. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची यांनी कथित देवाणघेवाणीच्या तपशीलात जाण्यासाठी नकार दिला होता.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी गेल्या डिसेंबरमध्ये विजय दिवस समारंभात ढाका येथे यजमानपद भूषवल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. उन्हाळ्याच्या शेवटच्या काही दिवसात बांग्लादेशच्या पंतप्रधान हसिना भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता असल्याचे समजते. परराष्ट्रमंत्री श्री जयशंकर शुक्रवारी भूतानला रवाना होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

RG Kar Case: दोन वर्षांनंतर आरजी कर प्रकरणाला नवं वळण! पुन्हा चौकशी होणार; शुभेंदू अधिकारी सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT