bank loan sakal media
देश

देशातील बँकांच्या बुडीत कर्जात वाढ

बँक कर्मचारी संघटनांचा दावा; रक्कम दोन लाख कोटींपर्यंत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आमच्या कारभारामुळे सरकारी बँकांचे एनपीए कमी होत असल्याचा दावा कोणीही करीत असले तरी प्रत्यक्षात मार्च २०२१ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षातही या बँकांच्या बुडित कर्जांची रक्कम (एनपीए) दोन लाख कोटी रुपयांनी वाढल्याचा दावा, बँक कर्मचारी संघटना ‘एआयबीईए’च्या वतीने करण्यात आला आहे.

या वर्षात एकूण २,०२,८७९ कोटी रुपयांची थकीत कर्जे वाढली. यात पंजाब नॅशनल बँकेचा वाटा सर्वात मोठा (६०,६२६ कोटी रु.) आहे. त्याखालोखाल कॅनरा बँक (४१,७९० कोटी), स्टेट बँक (२८,५६३) आणि बँक ऑफ बडोदा (२०,००५) अशी आकडेवारी आहे. युनियन बँक (१७,४४२), इंडियन बँक (९,४३०) आणि बँक ऑफ इंडिया (८,५४०) यांचीही बुडित कर्जे लक्षणीय आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक यांचेही एनपीए दीड हजार कोटी ते साडेसहा हजार कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. वरीलपैकी प्रत्येक बँकेतील एकूण चार मोठ्या बुडीत कर्जदारांची यादी पाहिली तर ती एकूण रक्कमच निम्मी म्हणजे ८९ हजार ३०० कोटी रुपये आहे.

‘निव्वळ धूळफेक’

दरवर्षी या बँका निर्लेखित (राईट ऑफ) करीत असलेल्या कर्जांची रक्कमही वाढती आहे आणि बुडीत कर्जेही वाढत आहेत. ही सर्व करदात्यांच्या डोळ्यांत धूळफेक करणे सुरू आहे, अशी प्रतिक्रिया कर्मचारी संघटनेचे नेते देविदास तुळजापूरकर यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT