India Bans 150 Sites esakal
देश

India Bans 150 Sites: सरकारने दोन वर्षांत 150 भारतविरोधी साइट्स आणि यूट्यूब चॅनेलवर घातली बंदी, नेमकी कारणं काय?

मंत्रालयाने 'या' यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली

सकाळ डिजिटल टीम

India Bans 150 Sites: मे 2021 पासून मंत्रालय आणि माहिती प्रसारण (I&B) द्वारे 150 हून अधिक वेबसाइट्स आणि YouTube-आधारित न्यूज चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे. या साइट्स आणि चॅनल्सचा वापर भारताविरुद्ध मजकूर तयार आणि पोस्ट करण्यासाठी केला जात होता.

IT कलम 69A चे उल्लंघन केल्यामुळे वेबसाइट आणि चॅनेल काढून टाकण्यात आले होते. या कलमामुळे केंद्राला भारताच्या अखंडतेच्या, भारताच्या सुरक्षिततेच्या हितासाठी कोणतीही सामग्री ब्लॉक करण्याचे आदेश देता येतात.

मंत्रालयाने या यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली

भारताविरुद्ध मजकूर बनवल्याबद्दल 150 हून अधिक वेबसाइट्स आणि YouTube न्यूज चॅनेल ब्लॉक केले. यामध्ये ज्या यूट्यूब न्यूज चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनलवर जास्त सबस्क्राइबर्स नाहीत. त्याचे 12,123,500 पेक्षा जास्त सदस्य होते आणि त्याची सामग्री फक्त 1,426,900 लोकांनी पाहिली होती.

बंदी घातलेल्या चॅनेलच्या यादीत न्यूज विथ फॅक्ट्स, इन्फॉर्मेशन हब, फ्लॅश नाऊ, मेरा पाकिस्तान आणि अपनी दुनिया टीव्ही यांचा समावेश आहे. 25 फेब्रुवारी 2021 रोजी बनवलेल्या नवीन IT नियमांनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने खोटी माहिती पसरवणाऱ्या आणि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या YouTube चॅनेलला प्लॅटफॉर्मवरून ब्लॉक करण्याचा आदेश जारी केला आहे.

जुलै 2022 मध्ये अनेक YouTube चॅनेलवर बंदी घालण्यात आली

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2021 ते 2022 दरम्यान 78 यूट्यूब न्यूज चॅनेल आणि 560 यूट्यूब लिंक्सना ब्लॉक करण्यात आलं. नियमांच्या विरोधात जाऊन त्यांचे चॅनेल ब्लॉक करण्यात आले. त्यांच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडिया अकाउंटवर कट रचण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि लोकांची दिशाभूल करून खोट्या अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल.

अहवालानुसार, जानेवारी 2022 मध्ये, केंद्राने 35 पाकिस्तान-आधारित यूट्यूब चॅनेल आणि दोन वेबसाइट्स ब्लॉक केल्या होत्या. कारण या चॅनलच्या माध्यमातून डिजिटल मीडियावर भारताविरूद्ध खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT