India China Troops Clash In Sikkim Pull Back After Dialogue 
देश

मोठी बातमी : भारत-चीन सीमेवर तणाव; भारतीय सैन्य आणि चिनी पीएलए यांच्यात संघर्ष

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सिक्किममधील भारत-चीन सीमेवर दोन्ही सैन्य आमने-सामने आले आहे. भारतीय सैन्य आणि चिनी पीएलए यांच्यात संघर्ष झाला. यामध्ये भारताचे 4 तर चीनचे 7 सैनिक जखमी झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे सीमेवर काही काळ तणाव निर्माण झाला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

एकीकडे जम्मू काश्मीरनजीक असणाऱ्या नियंत्रण रेषेवर सातत्याने शेजारी राष्ट्राच्या खुरापती सुरु असतानाच दुसरीकडे आता चीनचं सैन्यंही भारतीय सैन्यासमोर ठाकले आहे. शनिवारी (ता. ९)  उत्तर सिक्कीममधील नाकू ला सेक्टर येथे भारतीय आणि चीनी लष्करामध्ये तणावाची परिस्थिती उदभवली होती. मुख्य म्हणजे हा भाग कोणत्याही प्रकारच्या रस्त्याने जोडलेला नसून, तेथे हॅलिकॉप्टरने देखरेख केली जाते. दैनंदिन गस्त घालत असतानाच दोन्ही देशाचे सैन्य अधिकारी आमनेसामने आले आणि त्यांच्यात ही तणावाची परिस्थिती उद्भवली. हा वाद मिटवला गेला खरा पण, त्यामुळे वातावरण गंभीर झालं होतं. मुगुथांगच्या पुढेच नाकू ला सेक्टर आहे. मुळात इथे दोन्ही देशांमध्ये अशा प्रकारची टक्कर होण्याच्या घटना सहसा घडत नाहीत. 

भारतीय सैन्याशी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा प्रश्नाचा मुद्दा असल्यामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये अशा प्रकारे आमनासामना होत असतो. सहसा हे वाद अगदी प्राथमिक स्तरावरच परस्पर सामंजस्याने सोडवले जातात. पण, अशा प्रकारचा प्रसंग फार काळानंतर ओढावल्यामुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT