Corona Death Google file photo
देश

महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू, देशात आढळले साडेतीन लाख रुग्ण

सलग चौथ्या दिवशी तीन लाखाहून कोरोना रुग्ण आढळून आल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

सलग चौथ्या दिवशी तीन लाखाहून कोरोना रुग्ण आढळून आल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली आहे.

Corona Updates : नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीची स्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. दररोज नव्याने संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगवेगळे रेकॉर्ड बनवत आहे. भारतात शनिवारी (ता.२४) दिवसभरात ३ लाख ४९ हजार ६९१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ६९ लाख ६० हजार १७२ एवढी झाली आहे.

सलग चौथ्या दिवशी तीन लाखाहून कोरोना रुग्ण आढळून आल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. सध्या देशात २६ लाख ८२ हजार ७५१ एवढे सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात २ लाख १७ हजार ११३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी दोन लाखाहून अधिकजणांना घरी पाठविण्यात आलं आहे. आतापर्यंत १ कोटी ४० लाख ८५ हजार ११० रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. शनिवारी दिवसभरात २ हजार ७६७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा १ लाख ९२ हजार ३११ वर पोहोचला आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशभरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत १४ कोटी ९ लाख १६ हजार ४१७ जणांना लसीकरण करण्यात आलं आहे. शनिवारी दिवसभरात १७ लाख १९ हजार ५८८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. देशात आतापर्यंत २७ कोटी ७९ लाख १८ हजार ८१० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात ७७३ दिल्लीत ३४८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात सर्वाधिक ७७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राजधानी दिल्लीत ३४८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, केरळ, गुजरात, तमिळनाडू, राजस्थान, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही कोरोनाच्या नव्या रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढू लागली आहे. एकूण रुग्णसंख्येच्या ७४.१५ टक्के रुग्ण वरील सर्व राज्यांमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थोडे दिवस आणखी जगले असते तर... अपूर्णच राहिली धर्मेंद्र यांची 'ही' शेवटची इच्छा ; म्हणालेले- मला...

Ambegaon Leopard : विहिरीत पडलेल्या तीन ते चार महिन्याचा बछड्या; वनविभागाच्या शिताफीने अखेर यशस्वी रेस्क्यू!

Stray dogs: भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देऊ नका, नसता कारवाई; राज्य सरकारचे आदेश

Latest Marathi News Live Update : डॉ. गौरी आत्महत्येप्रकरणी योग्य तपास व्हावा - पंकजा मुंडे

Pune Police Action against Koyta Gang Video : पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या बदमाशांची जिरवली मस्ती; नागरिकांसमोरच बेदम चोपलं!

SCROLL FOR NEXT