देश

देशात 24 तासात 62 हजार नवे रुग्ण; अडीच हजार मृत्यू

कार्तिक पुजारी

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहेत. कोरोना रुग्णांची संख्या स्थिरतेकडे जात आहे. गेल्या 24 तासांत देशात 62 हजार 224 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

नवी दिल्ली- देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. कोरोना रुग्णांची संख्या स्थिरतेकडे जात आहे. गेल्या 24 तासांत देशात 62 हजार 224 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या 1 लाखांच्या आत आहे. मे महिन्यामध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. दररोज 3 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येत होते. कोरोना रुग्णसंख्येने 4 लाखांच्या आकडाही पार केला होता. पण, जून महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरताना दिसत आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 62 हजार 224 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 1 लाख 07 हजार 628 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहेत. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही कमी होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 2542 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 3 लाख 79 हजार 573 रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारतामध्ये सर्वाधिक कोरोना मृतांची नोंद झाली आहे.

देशात आतापर्यंत 2 कोटी 96 लाख 33 हजार 105 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 2,83,88,100 रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या 8 लाख 65 हजार 432 इतकी आहे. गेल्या काही दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या 10 लाखांच्या आता आली आहे. त्यामुळे ही समाधानाची बाब आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. आतापर्यंत देशातील 26 कोटी 19 लाख 72 हजार 014 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. मंगळवारी 28 लाख लोकांना लस देण्यात आली.

महाराष्ट्राची आकडेवारी

राज्यात मंगळवारी 9 हजार 350 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली, तर नवीन 15,176 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 56 लाख 69 हजार 179 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 38 हजार 361 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.69% झाले आहेhttps://www.youtube.com/watch?v=6ZfWAzgCuRU

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT