Corona Updates Google file photo
देश

Corona Update: देशात नव्या रुग्णसंख्येत किंचित घट

कार्तिक पुजारी

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज किंचित घटली आहे. गेल्या 24 तासांत देशात 42 हजार 909 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

नवी दिल्ली- देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज किंचित घटली आहे. गेल्या 24 तासांत देशात 42 हजार 909 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 34 हजार 763 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत देशातील 3 कोटी 19 लाख 23 हजार 405 लोकांनी विषाणूला हरवलं आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 76 हजार 324 इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (India corona update today)

देशात गेल्या 24 तासांत 380 कोरोना मृतांची नोंद झालीये. त्यामुळे कोरोना मृतांचा एकूण आकडा 4 लाख 38 कोटी 210 इतका झाला आहे. केरळ राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे भारताच्या रुग्णसंख्येमध्येही वाढ पाहायला मिळत आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासांत 29 हजार 836 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये ओणम सणानंतर रुग्णवाढ पाहायला मिळाली आहे. त्यामुळे सणांदरम्यान विशेष काळजी घेणे आवश्यक ठरले आहे.

कोरोनाला हरवण्यासाठी देशात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. तेव्हापासून आतापार्यंत 63.43 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. भारताचा एका दिवशी 1 कोटी डोस देण्याचा विक्रम आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत सर्व प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे सरकारचे लक्ष आहे. देशाचा रिकव्हरी रेट 97.51 टक्के आहे.

महाराष्ट्राची कोरोना आकडेवारी

राज्यात मृत्यूचा आकडा शनिवारच्या तुलनेत वाढला असून तो 131 झालाय. शनिवारी 126 रुग्ण दगावले होते. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1,37,157 इतका झाला आहे. राज्यातील रुग्णसंख्या काहीशी कमी झाली असून ज दिवसभरात 4,666 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 64,56,939 झाली आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या काहीशी वाढून 52,844 इतकी झाली. तर दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या वाढली असून आज 3,510 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62,63,416 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97 टक्के एवढे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fraud Case: एपीएमसीत विमा फसवणूक प्रकरण उघड! नावसाधर्म्याचा गैरफायदा घेऊन पॉलिसी रक्कम लाटली

Prashant Kishor Challenges BJP : प्रशांत किशोर यांचं भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान; म्हणाले, ''हिंमत असेल तर...''

Latest Marathi News Live Update : परतीच्या पावसाचा डबल धक्का! पिंपळगावच्या शेतकऱ्यांचा कांदा पाण्याखाली, लाखोंचे नुकसान

मुख्यमंत्र्यांच्या डेडलाइनला पावसाचा फटका! मुंबई-पुणे प्रवासाचा ‘एक्सप्रेस’ स्वप्नाला धक्का; मिसिंग लिंक उशिरा पूर्ण होणार

Rahul Gandhi Reaction : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावर राहुल गांधींनी व्यक्त केला संताप ; भाजप सरकावर मोठा आरोप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT