देश

चीनला इशारा, ४४ सेकंदात ७२ रॉकेट डागणारी पिनाका सिस्टिम तैनात

स्मर्चचा पल्ला पिनाकापेक्षा जास्त आहे. स्मर्चद्वारे ९० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर हल्ला करणे शक्य आहे.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: सीमेपलीकडून चीनने (china) कोणतीही आगळीक केल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पिनाका (pinaka) आणि स्मर्च (Smerch) मल्टीपल रॉकेट लाँचर सिस्टिम (MRLS) नियंत्रण रेषेजवळच्या फॉरवर्ड पोझिशन्सवर तैनात केली आहे. पिनाका रॉकेट सिस्टिम ३८ किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर प्रहार करु शकते. पिनाकाला सहा लाँचर्सची बॅटरी असून ४४ सेकंदात ७२ रॉकेट डागण्याची या सिस्टिमची क्षमता आहे.

पिनाका ही डीआरडीओने विकसित केलेली स्वदेशी बनावटीची मल्टीपल रॉकेट लाँचर सिस्टिम आहे. लेफ्टनंट कर्नल सारथ यांनी ही माहिती दिली. पिनाका आणि स्मर्च .या दोन्ही रॉकेट सिस्टिममुळे अत्यंत कमी वेळेत अचूकतेने शत्रूच्या लक्ष्यावर प्रहार करता येऊ शकतो असे कर्नल सारथ यांनी सांगितले.

स्मर्चचा पल्ला पिनाकापेक्षा जास्त आहे. स्मर्चद्वारे ९० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर हल्ला करणे शक्य आहे. चार लाँचर्समधून ४० सेकंदात ४८ रॉकेट डागता येऊ शकतात. स्मर्चचे वैशिष्टय म्हणजे कुठल्याही प्रदेशात ही सिस्टिम नेता येऊ शकते. पिनाकाच्या अपग्रेडड व्हर्जनचं उत्पादन सुरु आहे.

भविष्यात पिनाकाद्वारे ७५ किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर प्रहार करता येऊ शकतो. चीनच्या कुठल्याही दादागिरीला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्करही पूर्णपणे सज्ज आहे. उंचावरील या युद्ध क्षेत्रात भारताचा तोफखाना, एअर डिफेन्स गन्स, सैन्य तुकड्या तैनात आहेत. इथे तापमान मायनस म्हणजे उणे ३ ते ५ अंश सेल्सिअस आहे. भारताची ३,४८८ किलोमीटरची सीमारेषा चीनला लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? २० वर्षे जुनं प्रकरण पुन्हा उघडलं; PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : कोकणातील लोककलांना राजाश्रय मिळायला हवा; अनिकेत तटकरे

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT