India’s first hydrogen-powered train showcasing eco-friendly railway technology aimed at reducing carbon emissions and promoting sustainable transportation.

 

esakal

देश

India Hydrogen Train : मोठी बातमी! देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनच्या लाँचिंगचा मुहूर्त आला समोर

India’s first hydrogen train जाणून घ्या, कधी धावणार? अन् या ट्रेनची वैशिष्ट्ये फक्त एका क्लिकवर.

Mayur Ratnaparkhe

Hydrogen-Powered Train? : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच लाँच होणार आहे. ही ट्रेन जिंदमध्ये पोहोचली आहे आणि तिच्या ऑपरेशनपूर्वी आवश्यक तांत्रिक तयारी पूर्ण केली जात आहे. सध्या, ट्रेन आणि हायड्रोजन प्लांटची चाचणी सुरू आहे. आरडीएसओ  मधील तज्ज्ञ पथके या ठिकाणी उपस्थित आहेत.

ही ट्रेन पूर्णपणे भारतात डिझाइन आणि विकसित करण्यात आली आहे. ही जगातील सर्वात लांब आणि सर्वात शक्तिशाली ब्रॉडगेज हायड्रोजन ट्रेन मानली जात आहे. तर यंत्रसामग्री  उपकरणे आणि सुरक्षा प्रणालींची सखोल तपासणी केल्यानंतरच ट्रेनला हिरवा कंदील दिला जाईल. जाणून घ्या, ही हायड्रोजन ट्रेन कधी रुळांवर धावेल?

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन २० जानेवारी नंतर जिंद-सोनीपत मार्गावर धावेल. सध्या, ट्रेन आणि हायड्रोजन प्लांटच्या चाचण्या सुरू आहेत. सर्व सुरक्षा चाचण्या पूर्ण होताच, ट्रेनला हिरवा कंदील दिला जाईल आणि नियमित प्रवाशांसाठी ती सुरू होईल. अद्याप तारीख निश्चित केलेली नसली तरी, सर्व तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. त्यामुळे, २० जानेवारी नंतर कधीही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू होऊ शकते, असे मानले जाते.

या हायड्रोजन ट्रेनमध्ये १० डबे आहेत आणि एकूण २४०० किलोवॅट पॉवर असणार आहे. ट्रेनमध्ये दोन ड्रायव्हिंग पॉवर कार आहेत.  ज्यातील प्रत्येकाची क्षमता १२०० किलोवॅट आहे. एकावेळी अंदाजे २५०० प्रवासी प्रवास करू शकतात. तिचा कमाल वेग १४० किलोमीटर प्रति तास असा निश्चित केला आहे. इंधनाच्या वापराच्या बाबतीत, ही ट्रेन ३६० किलोग्रॅम हायड्रोजन वापरून अंदाजे १८० किलोमीटर प्रवास करू शकते.

ही ट्रेन मेट्रोच्या मॉडेलनुसार बनवण्यात आली आहे. कोचचे दरवाजे पूर्णपणे बंद झाल्यानंतरच ही ट्रेन स्टेशन सोडेल. ट्रेन धावत असताना जवळजवळ कोणताही आवाज होणार नाही, ज्यामुळे प्रवाशांना शांत आणि आरामदायी प्रवास मिळेल. प्रत्येक कोचमध्ये पंखे, लाईट, एअर कंडिशनर आणि डिजिटल डिस्प्ले आहेत जे पुढील स्टेशनबद्दल आधी माहिती देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: ठाकरेंच्या शिलेदारांचा महायुतीशी सामना, मुंबईत दुरंगी सामने अटीतटीचे ठरणार; कोण-कुठे लढणार?

Ruturaj Gaikwad: 'ऋतुराजला संधी तेव्हाच मिळेल, जेव्हा विराट आणि रोहित वनडेत...', R Ashwin नेमकं काय म्हणाला?

Election: निवडणूक की सत्तेचा सौदा? मतदारांचा विश्वास तुटतोय, मतदान टक्केवारी कमी होणार? मनपा निवडणुकांपूर्वीच प्रश्नचिन्ह

Angarki Sankashti Chaturthi 2026: अंगारकी चतुर्थीला करा 'हे' उपाय, भगवान गणेशाच्या आशीर्वादाने संपत्तीत होईल वाढ

Attack on US Vice President Residence : मोठी बातमी! अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स यांच्या वॉशिंग्टनमधील घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT