Bangladesh’s former Prime Minister Sheikh Hasina
India and Bangladesh relations : मागच्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी बांगलादेश सरकार कोसळल्यानंतर शेख हसीना भारताच्या आश्रयाला आहेत. दरम्यान आज (सोमवार, दि. १७ नोव्हेंबर) आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकार, बांगलादेशने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यापूर्वी कोर्टाने त्यांना फरार घोषित केलं होतं.
तर आता यावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली आहे. भारताने म्हटले आहे की आम्ही या निकालाचे बारकाईने निरीक्षण करत आहोत आणि बांगलादेशच्या हितासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत. भारत सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताने सांगितले आहे की बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने शेख हसीना यांच्याविरुद्ध दिलेल्या निकालाची नोंद घेतली आहे.
भारताने स्पष्टपणे म्हटले आहे की जवळचा शेजारी म्हणून, भारत बांगलादेशच्या लोकांच्या सर्वोत्तम हितासाठी वचनबद्ध आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की बांगलादेशमध्ये शांतता, लोकशाही, समावेशकता आणि स्थिरता राखणे आवश्यक आहे आणि भारत नेहमीच या मूल्यांच्या समर्थनात उभा राहील. याशिवाय देशात स्थिरता आणि लोकशाही वातावरण सुनिश्चित करण्यासाठी, बांगलादेशातील सर्व भागधारकांशी भारत रचनात्मक संवाद सुरू ठेवेल असेही निवेदनात म्हटले आहे.
शेख हसीना यांनी या निर्णयाला एकतर्फी आणि राजकीय प्रेरित निर्णय असल्याचं म्हटलंय. त्या म्हणाल्या, माझं म्हणणं ऐकून घेल्याशिवाय हा निर्णय देण्यात आलेला आहे. जनतेतून निवडून न आलेल्या सरकारच्या न्यायाधिकाराने हा निर्णय दिला आहे.. त्यामुळे हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.