Nor’westers Esakal
देश

Nor’westers: 'कालबैसाखी'च्या अभ्यासासाठी भारताचा पहिला प्रोजेक्ट लवकरच कार्यरत; जीवितहानी टळणार?

Kalbaisakhi: कालबैसाखीला ट्रॅक करण्यासाठी लवकरच ड्रोन्स, मोबाईल व्हॅन आणि उच्च तंत्रज्ञानाचे उपकरणे कार्यरत होणार आहेत.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कालबैसाखी ज्याला इंग्रजीमध्ये नॉरवेस्टर म्हटलं जातं दरवर्षी अनेकांचा जीव घेते. कालबैसाखी हे उन्हाळ्यात एप्रिल महिन्यामध्ये येणारा पाऊस आणि वादळी वाऱ्याची स्थिती आहे. कालबैसाखी पूर्व आणि उत्तर पूर्व भागावर सर्वाधिक प्रभाव पाडतो. याच संदर्भात हवामानशास्त्रज्ञांनी महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कालबैसाखीला ट्रॅक करण्यासाठी लवकरच ड्रोन्स, मोबाईल व्हॅन आणि उच्च तंत्रज्ञानाचे उपकरणे कार्यरत होणार आहेत.

कालबैसाखीमुळे दरवर्षी जीवितहानी होते. कालबैसाखीमुळे वादळी वारे वाहतात, वाऱ्यांमध्ये धुळ देखील असते. जोराचा पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत होते. झाडे उन्मळून पडतात. त्यामुळे साधन संपत्तीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा स्थितीत कालबैसाखीला व्यवस्थित ट्रॅक करता आलं, त्याचा उगम, ठिकाण आणी तीव्रता समजली तर जीवित आणि वित्तहानी टाळते येऊ शकते. याच दृष्टीने हवामानशास्त्रज्ञांनी पर्याय शोधून काढला आहे.

हवामानशास्त्रज्ञांच्या या नव्या प्रोजक्टसाठी जवळपास २५ कोटींचा खर्च येणार आहे. या प्रोजेक्टचे कंट्रोल सेंटर ओडिशाच्या भद्रेक जिल्ह्यातील चांदबाली येथे असणार आहे. भुवनेश्वरपासून हे कंट्रोल सेंटर १३० किलोमीटर अंतरावर आहे. या वर्षी कालबैसाखीचा प्रभाव कमी होता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातील वादळी वारे आणि पावसामुळे पश्चिम बंगालमधील काही जिल्हे, आसाम, त्रिपुरामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

भारतीय हवामान विभाग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (IITM), पुणे आणि नॅशनल सेंटर फॉर मेडियम-रेंज वेदर फॉरकास्टिंग (NCMRWF), दिल्ली संयुक्तपणे हा प्रोजेक्ट राबवतील. कालबैसाखीचा उगम, निर्मितीतील टप्पे, वाढ आणि पूर्व भागात त्याचे पसरणे याचा अभ्यास केला जाणार आहे. हवामानशास्त्रातील उपकरणे, ड्रोन आणि इतर साहित्यांच्या माध्यमातून कालबैसाखीचे पद्धतशीर ट्रॅकिंग केले जाईल.

पृथ्वी विज्ञान मंत्री किरन रिजेजू यांनी फेब्रुवारी महिन्यात लोकसभेमध्ये माहिती देताना सांगितलं होतं की, 2026 मध्ये हा प्रोजेक्ट कार्यरत होईल. नवा प्रोजेक्ट अस्तित्वात आल्यानंतर हवामानशास्त्रज्ञांना तीन तास अगोदर अंदाज व्यक्त करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांचे स्थलांतर करणे शक्य होईल आणि जीवितहानी टाळता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT