wari 
देश

मंदिर-मस्जिदीत प्रवेशासाठी केंद्र सरकारने प्रसिद्ध केली नियमावली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. 12 : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाचे 3 लाख रुग्ण आढळले आहेत. सरकारने कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी 25 मार्चपासून लॉकडाऊन केलं होतं. ते 1 जूनपासून अनलॉक करण्यात आलं आहे. देशातील वेगवेगळ्या भागात आता धार्मिक स्थळे उघडण्यास सुरुवात झाली आहे. याठिकाणी गर्दीवर नियंत्रणासाठी आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने शुक्रवारी नियमावली जाहीर केली आहे. आता धार्मिक स्थळी जाण्यासाठी प्रत्येकाला नियमांचे पालन करणं बंधनकारक आहे.

धार्मिक स्थळी प्रवेशासाठी गेटवरच सॅनिटायझर आणि थर्मल स्क्रीनिंग कऱावं लागणार आहे. मंदिर, मशिद, चर्च किंवा इतर धार्मिक ठिकाणी कोरोनाची लक्षणे नसलेल्या लोकांनाच प्रवेश दिला जाईल. ज्यांनी मास्क लावला असेल किंवा तोंडाला बांधले असेल त्यांना मंदिरात जात येईल. 

प्रत्येक धार्मिक स्थळी लोकांच्या प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवावे लागणार आहेत. याशिवाय सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन व्हावे यासाठी 6 फूट अंतरावर लोकांसाठी मार्किंग करावं लागेल. धार्मिक स्थालाच्या बाहेर पार्किंगमध्ये गर्दी होणार नाही याची योग्य ती काळजी घेण्यासाठी व्यवस्था करावी लागेल. भाविकांना त्यांच्या चपला वाहनांमध्येच ठेवाव्या लागतील. आवश्यकता असेल तर कुटुंबातील एक एक सदस्य मंदिरात जाईल.

धार्मिक स्थळी प्रवेश करण्याआधी हात आणि पाय धुणे बंधनकारक आहे. तसेच धार्मिक स्थळी बसण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईळ याची काळजी घेतली पाहिजे. धार्मिक स्थळी असलेल्या मूर्ती, समाधी याठिकाणी हाताने स्पर्श करण्यास परवानगी नाही. एखादा कोरोनाचा संशयित दिसला तर त्याला वेगळ्या खोलीत ठेवावं. त्याला चेहऱ्यासाठी मास्क देऊन जिल्हा हेल्पलाइनला कळवावे. आरोग्य अधिकारी योग्य निर्णय घेतील आणि धार्मिक स्थळ सॅनिटाइझ केलं जाईल. धार्मिक स्थळी 24 ते 30 डिग्री सेल्सियसच्या दरम्यान तापमान ठेवण्यात यावं असंही सरकारने सांगितलं आहे. 

लोकांना कोरोनाबाबत जागृत करण्यासाठी पोस्टर आणि व्हिडिओ संदेश लावण्यात यावेत. वेळोवेळी परिसर सॅनिटाइझ करावा. तसंच फेस मास्क, ग्लोव्हज फेकण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात यावी. याशिवाय परिसरात असलेल्या दुकाने, कॅफेटेरियात सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल याकडे लक्ष द्यावं. 

प्रार्थनेसाठी स्वत:ची चादर किंवा चटई घेऊन यावी. तसंच धार्मिक स्थळी प्रसादासाठी परवानगी नाही. लंगर आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जावे. सरकारने सुरुवातीपासूनच 65 वर्षांवरील व्यक्ती आणि 1 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं तसंच गर्भवती आणि आजारी लोकांना घरी राहण्याचा सल्ला दिला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT