India spent 38 lakhs on Trump Fisrt India tour In india  esakal
देश

ट्रम्प कुटुंबाच्या भारत दौऱ्यावेळी मोदी सरकारची उधळपट्टी, RTIचा धक्कादायक खुलासा

मोदी सरकारने एकंदरीत चाळीस लाखाची उधळपट्टी ट्रम्प यांच्या पहिल्या भारत दौऱ्यावर केली होती

सकाळ डिजिटल टीम

ट्रम्प त्यांच्या पहिल्या भारत दौऱ्यावर त्यांची पत्नी मोनालिसा, मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर आणि अनेक अधिकाऱ्यांसह २०२० मध्ये भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी अहमदाबाद, आगरा आणि दिल्लीचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान भारताने भला मोठा खर्च केला होता. माहिती अधिकाराच्या माध्यमातून याबाबतची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. (India spent 38 lakhs on Trump Fisrt India tour In india)

विदेश मंत्रालयाने केंद्रिय सूचना आयोगाला एका आरटीआय अर्जाच्या उत्तरात याबाबतची माहिती दिली आहे. केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे २०२० मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या ३६ तासाच्या शासकीय दौऱ्याचा आणि त्यांच्या खाण्यापिण्याचा एकूण खर्च ३८ लाख रुपये आला होता. मोदी सरकारने एकंदरीत चाळीस लाखाची उधळपट्टी ट्रम्प यांच्या पहिल्या भारत दौऱ्यावर केली होती.

यावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती ट्रम्प त्याच्या संपूर्ण परिवारासह आणि काही अधिकाऱ्यांसह पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आले होते. मोदी आणि ट्रम्प यांचे मैत्री संबंधही चांगले होते. अहमदाबाद मध्ये पोहोचल्यावर ट्रम्प यांनी मोठ्या जनसमुदायाला संबोधितही केलं होतं. या दौऱ्यात त्यांनी पाकिस्तानचाही संदर्भ दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६ जूनला रायगडावर इतिहास जिवंत होणार! शिवराज्याभिषेक सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, शिवरायांचा उत्सव चुकवू नका

Pune Politics: महापालिकेपासून विधान परिषदपर्यंत ‘साखरपेरणी’; विक्रम काकडेंच्या उमेदवारीमागील राजकीय गणित, पुण्यात दोन दिवसांतच फिरली समीकरणे

Yavatmal: वैद्य नगरातील जुगारावर छापा; 12 जुगारी अटकेत; अवधूतवाडी पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : पुण्यात हवाई दलाच्या कर्मचाऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू

Yavatmal: पोलिस अधिकार्‍यांच्या विभागीय बदल्या; काही बदल्यांना स्थगिती; पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा समावेश

SCROLL FOR NEXT