Corona patients sakal media
देश

भारतात AY.4.2 व्हेरियंटमुळे हाय अलर्ट; ब्रिटनमध्ये घातलाय धुमाकूळ

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ब्रिटन आणि यूएसए मध्ये SARS CoV 2 च्या डेल्टा व्हेरिएंटचा धोकादायक उपप्रकार सापडल्यानंतर आता भारतात देखील खबरदारी घेतली जात आहे. AY.4.2 असं या नव्या व्हेरियंटचे नाव असून Covid genomic surveillance project सध्या हाय अलर्ट मोडवर आहे. कारण, शास्त्रज्ञांनी याआधीच असं सूचित केलंय की व्हायरसचा हा नवीन प्रकार डेल्टा स्ट्रेनपेक्षा अधिक संक्रमणीय असू शकतो. अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या मंगळवारी ब्रिटनमध्ये तब्बल 223 मृत्यू झाले, जे या वर्षी मार्चनंतरचे सर्वाधिक आकडे आहेत. त्याचबरोबर 43,738 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे यूकेमध्ये डेल्टाचे नवीन रूप तसेच या व्हेरिएंटचे नाव AY.4.2 असल्याचे मानले जाते. यूकेच्या आरोग्य विभागाने नवीन व्हेरिएंटच्या प्रसारासाठी नवीन व्हेरिएंटला जबाबदार धरले आहे आणि त्याचे मूल्यांकन करण्यास सांगितले आहे.

AY.4.2 ला आता यूके मध्ये 'variant under Investigation' म्हणून घोषित केलंय. म्हणजेच ज्यावर संशोधन सुरु असून त्याच्याभोवतीचं गूढ अद्याप उकललेलं नाहीये.

INSACOG प्रकल्पाअंतर्गत संपूर्ण जीनोम सिक्वन्सिंग झालेल्या SARS CoV 2 बाधित रुग्णांच्या 68,000 पेक्षा जास्त नमुन्यांची चाचणी केली असता आतापर्यंत तरी हा व्हेरियंट भारतात सापडला नाहीये. मात्र, आम्ही यासंदर्भात खबरदारी घेत अधिक पाळत ठेवणार आहोत आणि येत्या काही दिवसांतील आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे आणखी नमुने तपासले जाणार आहेत. जेणेकरून AY 4. 2 मुळे होणारे संभाव्य संक्रमण आपण टाळू शकू, असं मत INSACOG च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

एकीकडे भारतासह संपूर्ण जगात कोरोना (coronavirus) रुग्णांच्या आकडेवारीमध्ये घट झाली असताना आता दुसरीकडे ब्रिटनमध्ये (britain) हा नवा व्हेरियंट चिंतेचं कारण ठरला आहे. हाच व्हेरियंट भारतातील संशोधकांच्या चिंता वाढवतो आहे. अधिकृत आकडेवारीनुसार ब्रिटनमध्ये 24 तासात 223 अचानक मृत्यू झाल्याने दहशत पसरली आहे, त्यामुळेच भारतात देखील अधिक खबरदारी घेतली जात आहे.

याबाबत प्रथम जुलै 2021 मध्ये माहित झाले होते. डेल्टा व्हेरिएंटमध्ये काही नवीन उत्परिवर्तन आहेत, जे स्पाइक प्रोटीनवर परिणाम करतात. तज्ज्ञ सांगतात की AY.4.2 संभाव्यतः अधिक संसर्गजन्य आहे. परंतु याची तुलना डेल्टा किंवा अल्फा व्हेरिएंटशी केली जाऊ शकत नाही जी 50 ते 60% अधिक संसर्गजन्य होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT