भारत पाकिस्तान युद्ध 1971 (INDIA PAK WAR 1971)
भारत पाकिस्तान युद्ध 1971 (INDIA PAK WAR 1971) ESAKAL
देश

भारताचा एक घाव, पाकचे दोन तुकडे; असा झाला बांग्लादेशचा जन्म

सकाळ डिजिटल टीम

भारत-पाकिस्तान युद्ध 1971 (INDIA PAK WAR 1971):

1971 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी हवाईदलानं भारतीय हवाईदलाच्या (INDIAN AIR FORCE) तळांवर बाँम्बहल्ले करून युद्धाची तार छेडली. त्याला प्रत्युतर देताना भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी अतुलनीय शौर्य गाजवलं आणि पाकिस्तानी सेनेला शरण येण्यास भाग पाडलं.

या युद्धात भारताने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला. पाकिस्तानच्या 90,000 पेक्षा जास्त सैनिकांनी भारतापुढे शरणागती पत्करली. कोणत्याही देशाच्या सैनिकांनी एवढ्या मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करण्याची दुसऱ्या महायुद्धानंतरची (WORLD WAR) ही पहिलीच वेळ होती.

भारत पाक युद्धाची पार्श्वभूमी- 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान जेव्हा स्वतंत्र झाला, तेव्हा पाकिस्तान पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान अशा दोन भागात विभागला गेला होता. पश्चिम पाकिस्तान म्हणजे सध्याचा पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे सध्याचा बांग्लादेश. पूर्व पाकिस्तानमध्ये (सध्याचा बांग्लादेश) बंगाली भाषिकांची संख्या जास्त होती, तर पश्चिम पाकिस्तानचे लोक प्रामुख्याने उर्दू किंवा हिंदी भाषिक होते. देश जरी एक असला तरी पश्चिम पाकिस्तानी लोक पूर्व पाकिस्तानी लोकांना नेहमीच द्वेष करायचे.

1970 मध्ये पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या युद्धात पूर्व पाकिस्तानातील शेख मुजिबूर रहमान (SHEIKH MUJIBUR RAHMAN)यांच्या अवामी लीगने 169 पैकी 167 जागा जिंकल्या. पाकिस्तानी संसदेत अवामी लीगचे बहुमत झाले. आवामी लीगचे नेते शेख मुजिबूर रहमान यांनी राष्ट्राध्यक्षांपुढे सरकार स्थापनेचा दावा केला. परंतु वर्षानुवर्षे पाकिस्तानवर राज्य करणाऱ्या पश्चिम पाकिस्तानातील राजकारण्यांना हे रुचलं नाही. त्यामुळे झुल्फिकार अली भुट्टो यांनी मुजिबूर यांना पंतप्रधानपद देण्यास विरोध केला आणि राष्ट्राध्यक्ष याह्याखान यांनी पूर्व पाकिस्तानात थेट सेनेला तैनात केले.

india pak war

मुजिबूर रहमान यांना अटक- पूर्व पाकिस्तानात पाक लष्कराने सर्वत्र अटकसत्र व दडपशाही सुरू केली. सुरुवातीला तेथील जनतेने विरोध केला, परंतु 25 मार्च 1971 पर्यंत पाक लष्कराने ढाका (DHAKA) शहरावर ताबा मिळवला व अवामी लीगवर बंदी घालण्यात आली. मुजिबूर रहमान यांना अटक करून पश्चिम पाकिस्तानात त्यांची रवानगी केली गेली. 27 मार्च 1971 रोजी झिया उर-रहमान यांनी मुजिबूर रहमान यांच्या वतीने बांग्लादेशच्या (BANGLADESH) स्वातंत्र्याची घोषणा केली. यामुळे पूर्व पाकिस्तानात स्वातंत्र्याची ओढ लागलेले हजारो लोग मुक्तिवाहिनीमध्ये सामिल झाले.

1 कोटी लोक जीव वाचवण्यासाठी भारतात शरण- पूर्व पाकिस्तानातील बंड दडपताना पाकिस्तानी लष्कराने क्रुरतेचा कळस गाठला होता. आपल्याच देशातील सुमारे 30-40 लाख लोकांचं शिरकाण केलं गेले. लाखो महिलांवर बलात्कार केले गेले. लष्कराच्या या अत्याचारामुळे पूर्व पाकिस्तानातील लोक घाबरुन देश सोडून भारतात घुसखोरी करू लागले. सुरुवातीला भारताने या आश्रितांना मदतीची भावना ठेवली. त्यांच्यासाठी कॅम्प उभारले. पण ही संख्या एक कोटीच्या घरात गेली आणि पूर्व पाकिस्तानमधील ही अराजकता भारतासाठी समस्या बनली.

india won 1971 war against pakistan

इंदिरा गांधीनी रशियाकडून मदतीचे आश्वासन मिळवले- भारत सरकारने पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती सुधारण्याबाबत पाकिस्तानशी चर्चा केली. मात्र पाकिस्तानंने त्याकडे लक्ष दिले नाही. कारण याच सुमारास पाकिस्तानने अमेरिकडून युद्धकाळात मदत मिळवण्याचे आश्वासन मिळवले होते.

पुढे भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (INDIRA GANDHI) यांनीही उघडपणे स्वतंत्र बांग्लादेशाच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला आणि पूर्व पाकिस्तानी जनतेला सर्वतोपरी मदत पुरवण्याचे आश्वासन दिले. एप्रिल १९७१ मध्ये इंदिरा गांधींनी युरोपचा झंजावाती दौरा केला. त्यानंतर ९ ऑगस्ट १९७१ रोजी श्रीमती गांधींनी रशियाशी २० वर्षाचा मैत्रीचा करार करून सर्व जगाला खासकरून अमेरिकेला व ब्रिटन व फ्रान्ससारख्या देशांना धक्का दिला. रशियासोबतच्या मैत्रीमुळे चीनही या युद्धापासून दूर राहिला. दरम्यानच्या काळात भारताने प्रशिक्षित केलेल्या मुक्तिवाहिनीने पूर्व पाकिस्तानाच पाक सैनिकांवर हल्ले करायला सुरुवात केली. भारताने त्यांना लष्करी साहित्याची मदत केली.

पाकने छेडले युद्ध, भारताचे सडेतोड प्रत्युत्तर- दिवसेंदिवस भारत आणि पाकिस्तानमधील हा तणाव अधिक वाढत गेला आणि युद्ध होणार हे जवळपास निश्चित झाले. इकडे थंडीमुळे चिनी आक्रमणाची शक्यताही कमी झाली. त्यामुळे भारताने पूर्व पाकिस्तान सीमेवर सैन्य जमा केले होते. दरम्यान 23 नोव्हेंबर 1971 रोजी पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष याह्याखान यांनी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू केली आणि 3 डिसेंबर रोजी पाकिस्तानी हवाईदलाने उत्तर भारतातील अनेक हवाईतळांवर हल्ले चढवून युद्धाची सुरुवात केली. परंतु भारताला या हल्ल्याची पूर्वकल्पना होती त्यामुळे भारताचं फारसं नुकसान झालं नाही. त्यानंतर दुसर्‍या दिवशीच इंदिरा गांधींनीही युद्धाची घोषणा केली आणि भारतीय सैन्य ढाक्याच्या दिशेने रवाना झाले. पाकिस्तानी सैनिकांना पूर्व पाकिस्तानातून हकलण्याचा भारताचा प्लॅन होता. मात्र पाकिस्तानला मात्र भारतीय सैनिकांना पूर्व पाकिस्तानात घुसण्यापासून रोखण्यासोबतच पश्चिमेकडून भारतात घुसून जास्तीक जास्त क्षेत्र काबीज करायचं होते.

indira gandhi met leonid brezhnev

भारताच्या 120 जवानांनी पाकच्या 2000 सैनिकांना रोखलं- पाकिस्तानने पश्चिम सीमेवर अनेक ठिकाणी हल्ले केले. पण भारतीय सैनिकांनी (INDIAN ARMY) त्यांना मात दिली. राजस्थानमधील लोंगेवाला येथून भारतात घुसण्याचं पाकनं ठरवलं होतं. या पोस्टवर केवळ 120 भारतीय सैनिक असल्याचं पाकला माहित होते. त्या काळात हवाईदल रात्री हल्ला करण्यास सक्षम नव्हतं. त्यामुळे पाकिस्तानने रात्री घुसखोरी करण्याचं ठरवलं होतं. परंतु पाकचे हे मनसुबे भारतीय सैनिकांनी धुळीस मिळवले. फक्त 120 सैनिकांनी कित्येक रणगाडे आणि आधुनिक शस्त्रास्त्रांसह आलेल्या सुमारे 2000 पेक्षाही अधिक पाकिस्तानी सैन्याला रोखून धरले. सुर्योदय होताच भारतीय हवाईदलानं पाकिस्तानच्या सैन्याला सळो की पळो करून सोडलं.

रशियानं निभवली मैत्री, अमेरिकी नौदलाची माघार- भारताची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतने (INS VIKRANT) बंगालच्या उपसागरात (BAY OF BENGAL) पाकिस्तानची पूर्ण नाकेबंदी केली होती. आयएनएस विक्रांतला उध्वस्त करण्याच्या हेतून पाकिस्तानने अमेरिकेकडून घेतलेली अत्याधुनिक अशी पाणबुडी ‘पीएनएस गाझी’ (PNS GAZI) रवाना केली. पण नौदलाने (NAVY) तिलाही उध्वस्त केली. यादरम्यान पाकिस्तानने अमेरिकेची मदत मागितली. त्यानुसार अमेरिका आणि ब्रिटनच्या नौदलांचा ताफा भारताच्या दिशेने रवाना झाला. पण रशियाने मैत्री निभावली आणि आपल्या अण्वस्त्रधारी पाणबुड्या रवाना केल्या. रशियाच्या प्रवेशाने अमेरिका आणि ब्रिटननेही माघार घेतली आणि भारतावरचं मोठं संकट टळलं. याशिवाय ऑपरेशन पायथॉनअंतर्गत (OPERATION PYTHON) भारतीय नौदल आणि हवाईदलाने पूर्व पाकिस्तानात चितगाव (CHITGAV) येथील पाकिस्तानी विमानतळ उद्ध्वस्त केले. याशिवाय नौदलाने कराची बंदरावरही हल्ला केला आणि सोबतच पाकिस्तानच्या काही विनाशिकाही उध्वस्त केल्या. तसेच पाकिस्तानकडे येणारे सर्व जलमार्गही रोखून धरले.

ins vikrant

पाकिस्तानची शरणागती- भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याची सर्व बाजूंनी कोंडी केली. पाकिस्तानच्या 90000 हून अधिक सैनिकांना भारतानं युद्धबंदी केले. भारतीय सेनेने आक्रमक भूमिका घेऊन ढाक्यासह पाकिस्तानच्या सीमेलगतचा एकूण 14000 चौ.किमी इतका मोठा भूभाग काबीज केला. भारतीय सैनिक अजूनही पाक सीमेत घुसतच होते. पाकिस्तानला हे सर्व अनपेक्षित होतं. पंधरा दिवसांच्या आतच पाकिस्तानी सैन्याची सर्व बाजूंनी होत असलेली धुळधाण पाहून पाकिस्तानला शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय उरला नाही. 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्ताननं शरणागती पत्करली. पाकिस्तानच्या वतीने लेफ्टनंट जनरल ए.के. नियाझी यांनी शरणपत्रावर सही केली. भारत-पाकमध्ये झालेल्या शिमला कराराअंतर्गत (SHIMLA AGREEMENT) भारतानं पाकिस्तानच्या युद्धबंदींना सोडून दिले आणि जिंकलेला सर्व भूभागही पाकिस्तानला परत करण्यात आला.

युद्धाचे परिणाम- भारताने लगेचच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि जगाच्या नकाशावर बांगलादेश हा नवीन देश उदयास आला. याह्याखान यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला तसेच मुजिबूर रहमान यांची मुक्तता करण्यात आली. 10 जानेवारी 1972 रोजी मुजिबूर रहमान बांगलादेशात परत आले.

या युद्धादरम्यान भारताच्या तिन्ही सैन्यदलांचं शौर्य साऱ्या जगानं पाहिलं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या परिस्थितीला अतिशय मुत्सद्दीपणे हाताळले. जवळपास 4 हजार सैनिक या युद्धात शहीद झाले. पाकिस्तानच्या मृत सैनिकांची संख्या आजही निश्चित नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT