Bipin Rawat Team eSakal
देश

"१९७१ च्या भारत-पाक युद्धाने दक्षिण आशियाई उपखंडाचा भूगोल बदलला"

हवाई दलाच्या स्वर्णिम विजय वर्ष सोहळ्यात ते बोलत होते.

सुधीर काकडे

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी १९७१च्या भारत-पाक युद्धाला दक्षिण आशियाई उपखंडाचा भूगोल बदलणारी एक ऐतिहासिक घटना म्हटले आहे. केवळ १४ दिवसांच्या कालावधीत युद्ध यशस्वीरित्या संपले आणि पाकिस्तानच्या राजवटीतून मुक्ती घेऊन बांगलादेश हे एक सार्वभौम राष्ट्र जन्माला आले, असेही रावत यांनी यावेळी सांगितले. आज हवाई दलाच्या स्वर्णिम विजय वर्ष सोहळ्यात ते सहभागी झाले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि हवाई दलाचे प्रमुख विवेक राम चौधरी हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.

भारत आणि पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेलं युद्ध हे एक ऐतिहासिक युद्ध आहे. इतिहासातील हे युद्ध प्रदेश मिळवण्यासाठी नाही तर मानवता आणि लोकशाहीच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी झाले होते, असे वक्तव्य आज संरक्षम मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं.

भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी १९७१ च्या युद्धाला लष्करी युद्धाच्या इतिहासात नोंदवलेल्या सर्वात लहान आणि सर्वात जलद विजय मिळवलेल्या युद्धांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. ९३००० पाकिस्तानी सैनिकांचे आत्मसमर्पण हे दुसऱ्या महायुद्धानंतर आतापर्यंतचे सर्वात मोठे आत्मसमर्पण असल्याचे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, भारतीय सैन्य पश्चिम आणि पूर्वेकडील मोर्चांवर एकत्रितपणे लढले, तसेच जमिनीवर आणि समुद्रावत आपला पराक्रम दाखवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT