कोरोना तपासणी ईसकाळ
देश

मोठा दिलासा... रुग्णसंख्या 90 हजारांच्या खाली

नामदेव कुंभार

coronavirus in india, covid-19, latest updates: भारतीयांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हळू-हळू ओसरत आहे. दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्या आणि मृतांच्या संख्येमध्येही मोठी घट पाहायला मिळत आहे. दररोज आढळणारी कोरोना रुग्णसंख्या तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच एक लाखांच्या खाली आहे. तर मृताची संख्याही 2200 च्या खाली घसरली आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्ण आणि मृताच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळाली आहे. याच कालावधीत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, उत्तर प्रदेश आणि गुजरातसारख्या राज्यात कोरोना आटोक्यात आल्यामुळे देशातील रुग्णसंख्या घटत आहे. महाराष्ट्रात नवीन कोरोना रुग्णसंख्या दहा हजारांच्या खाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी देशात 86 हजार 498 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दोन हजार 123 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत देशात एक लाख 82 हजार 282 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जवळपास संपूर्ण देश महिनाभरापासून अनलॉक होता. त्यामुळेच कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे.

देशातील कोरोना स्थिती -

एकूण कोरोना रुग्ण : 2,89,96,473

एकूण कोरोनामुक्त : 2,73,41,462

एकूण मृत्यू : 3,51,309

उपचाराधीन रुग्ण : 13,03,702

एकूण लसीकरण : 23,61,98,726

आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 36 कोटी 82 लाख 7 हजार 596 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सोमवारी देशात 18 लाख 73 हजार 485 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत रेल्वे आता स्लीपर कोचमध्ये, 'या' मार्गावर धावणार; पैसा आणि वेळेचीही होईल बचत

Nagpur Munciple Election 2025 : नागपूरमध्ये हायव्होलटेज ड्रामा! अर्ज मागे घेऊ नये म्हणून अपक्ष उमेदवाराला घरातच कोंडलं

Latest Marathi News Live Update : 'दोन्ही पक्षाचे नेते आज बैठकीत निर्णय घेतील' - सुनील टिंगरे

Navi Mumbai Crime : ऑनलाईन मैत्री ठरली जीवघेणी, दहावीच्या विद्यार्थ्याचे अपहरण अन् मागितली २० लाखांची खंडणी

Bribery Action: बुलढाण्यात सहायक वनसंरक्षक व लिपिकाला १५ हजारांची लाच घेताना पकडलं, लाचलुचपतच्या कारवाईने खळबळ!

SCROLL FOR NEXT