corona update sakal Media
देश

24 तासात 2 लाख 67 हजार रुग्णांची नोंद, मृत्यूही वाढले

ओमकार वाबळे

देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचा स्फोट झाल्याचं पाहायला मिळतंय. भारतात गेल्या चोवीस तासात 2 लाख 68 हजार 833 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल (शुक्रवार) सापडलेल्या रुग्णसंख्येत 4 हजार 631 जणांची भर पडली आहे. सध्या देशात 14 लाख 17 हजार 820 अॅक्टिव्ह कोरोना केसेस असून पॉझिटिव्हिटी रेट 16.66 टक्क्यांवर गेला आहे. (India Corona Update)

दिवसेंदिवस दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेटही वाढत असून ही चिंतेची बाब आहे.काल पॉझिटिव्हीटी रेट हा १४.७८ टक्क्यांवर होता आज तो १६.६६ वर गेला आहे. येणाऱ्या काळात तो आणखी वाढण्याची शक्यता बळावली आहे. दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्हिटी रेट ११ टक्क्यांवर होता. तर दुसऱ्या बाजुला ओमिक्रॉनच्या (Omicron) रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

आतापर्यंत देशात ५ हजार ७५३ जणांना कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनची लागण झाली आहे. आज यामध्ये आणखी वाढ झाल्याचं चित्र आहे. आज देशात ६ हजार ४१ ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत.

भारतातील मृत्यू वाढले

झपाट्याने सर्वांना लागण होत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. याचसोबत आज मृत्यू झालेल्यांचा आकडा देखील वाढला आहे. देशात चोवीस तासात ४०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशभरात ४ लाख ८५ हजार ४७२ जणांना प्रण गमवावे लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: 500 च्या जळलेल्या नोटा कुणाच्या होत्या? Justice Yashwant Varma Cash कांडाची पूर्ण Timeline

Mumbai High Court Order : जयगड बंदरातील आमिराती गॅसवाहू जहाजाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; साडेनऊ कोटी भरा, नाहीतर गॅस रिकामा करा!

Pune Tunnel: पुण्यात आणखी एक बोगदा! सुतारदरा ते पाषाण भुयारी मार्गासाठी लवकरच सल्लागार नियुक्त, महापालिकेचा मोठा प्लॅन

Latest Marathi News Live Update : पुण्यात वारजे कर्वेनगर भागात पडलेल्या प्रचंड खड्डे दुरुस्ती साठी मनसे तर्फे वारजे क्षेत्रीय प्रमुखांना तुकाराम मुंडे यांची प्रतिमा भेट

Gokul Election Update : 'गोकुळ'ची बहुचर्चित प्रारूप मतदार यादी जाहीर; 4,897 संस्थांना मतदानाचा हक्क, 'इतक्या' संस्थांना बसला फटका!

SCROLL FOR NEXT