कोरोना 
देश

कोरोनाचे नवीन रुग्ण एक लाख, दुसरी लाट ओसरली

नामदेव कुंभार

कोरोना महामारीची दुसरी लाट हळू-हळू ओसरत आहेत. दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्यामध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी घट पाहायला मिळाली. रविवारी देशात एक लाख 636 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. मागील तीन महिन्यातील ही सर्वात कमी कोरोना रुग्णवाढ आहे. मागील काही दिवसांमध्ये कोरोनाच्या दुसरी लाट हळूहळू कमी होत असल्याचं दिसत आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत एक लाख 636 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 2427 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांतील मृताची संख्याही घटताना दिसत आहे. याच कालावधीत एक लाख 74 हजार 399 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशातील उपचाराधीन रुग्णसंख्याही घसरली आहे. देशातील उपचाराधीन रुग्णसंख्या 14 लाखांपर्यंत येऊन ठेपली आहे.

ICMR नं दिलेल्या माहितीनुसार, रविवारी देशात 15 लाख 87 हजार 589 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आतापर्पंत देशात 36 कोटी 63 लाख 34 हजार 111 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

देशातील सध्याची कोरोना स्थिती -

एकूण कोरोना रुग्ण - 2,89,09,975

एकूण कोरोनामुक्त - 2,71,59,180

एकूण मृत्यू - 3,49,186

उपचाराधीन रुग्ण - 14,01,609

एकूण लसीकरण - 23,27,86,482

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI BR Gavai यांनी असा निकाल दिला की इतर न्यायाधीश संतापले, नेमकं प्रकरण काय होतं? जोरदार झाला वादविवाद

आशियाई विजेत्या भारतीय तिरंदाजांची अवहेलना; १० तास विमानतळावर अडकले; अस्वच्छ धर्मशाळेत वास्तव्य...

Grain Scam:'शासकीय धान्याचा ८७ लाखांचा अपहार'; फलटण तालुक्यातील धक्कादायक प्रकार, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ..

मोठी बातमी! शैक्षणिक सहलींसाठी विद्यार्थ्यांसाठी सहलीत ५० टक्के सवलत; प्रत्येकास १० लाखांचा अपघात विमाही; एसटी महामंडळाचे आगारप्रमुख जाणार शाळांमध्ये

आजचे राशिभविष्य - 19 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT