Corona Patient Updates in India  sakal media
देश

देशात 24 तासांत 3 लाख 47 हजार नवे रुग्ण

काल दिवसभरात 703 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सुधीर काकडे

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत (Covid19 Cases) कमालीची वाढ होताना दिसते आहे. त्यातच काल पुन्हा देशात नवे कोरोना 3,47,254 रुग्ण आढळले आहेत. परवाच्या तुलनेत तब्बल 29,722 अधिक रुग्ण आढळले आहेत. तर मागच्या 24 तासांत तब्बल 703 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 20,18,825 सक्रीय रुग्ण आहेत. तर सध्याच्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधित होण्याचा दर 17.94 टक्क्यांवर (Daily positivity rate) पोहोचला आहे.

देशात कोरोनामुक्त होण्याऱ्यांची संख्याही चांगली असल्याने दिलासा मिळाला आहे. काल दिवसभरात 2,51,777 रुग्ण कोरोनामुक्त (Recoveries) झालेत आहेत. कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत सर्वाधिक सक्रिय रूग्ण आढळत असून ही चिंताजनक परिस्थिती असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल सांगितले. (Corona Patient Updates in India)

दरम्यान, महाराष्ट्रासह अन्य दोन राज्यांत केंद्रीय पथके पाठविण्यात आली असून चाचण्या आणि लसीकरण या दोन्हींचे प्रमाण तत्काळ वाढविण्याची सूचना या राज्यांच्या आरोग्य यंत्रणांना करण्यात आल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्रात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर दोन टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत गेला, ही चिंताजनक बाब असल्याचेही केंद्राने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT