देश

दिलासादायक! दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येत घट

नामदेव कुंभार

दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधित (COVID19 ) रुग्णांच्या संख्येत रविवारी घट पाहायला मिळाली आहे. चार लाखांनी वाढणारी रुग्णसंख्यांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Health Ministry) सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी देशात तीन लाख 66 हजार 161 नवीन रुग्ण आढळले आहेत. बुधवार ते शनिवार लागोपाठ चार दिवस दररोज 4 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले होते. आज, रविवारी देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, रविवारी देशात तीन लाख 66 हजार 161 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर तीन लाख 53 हजार 818 रुग्णांनी कोरोनावर मात (discharges) केली. याच कालावधीत तीन हजार 754 रुग्णांचा मृत्यू झालाय. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (Total cases) दोन कोटी 26 लाख 62 हजार 575 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत एक कोटी 86 लाख71 हजार 222 रुग्णांनी कोरोनावर मात (Total discharges) केली आहे. याच कालावधीत देशात आतापर्यंत दोन लाख 46 हजार 116 जणांचा कोरोनामुळे (Death toll) झालाय. देशात सध्या 37 लाख 45 हजार 237 रुग्ण उपचाराधीन (Active cases) आहेत.

महाराष्ट्रपासून जम्मूपर्यंत कोलकातापासून केरळपर्यंत विविध राज्यात लॉकडाउनस, कर्फ्यू, संचारबंधी आणि निर्बंध लावण्यात आले आहेत. देशातील 80 टक्के राज्यात निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्यामुळेच कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hybrid Home Loan New Scheme: होम लोनच्या EMI ची चिंता मिटणार? ६५ महिन्यांसाठी व्याजदर लॉक करता येणार; 'या' बँकेची नवी हायब्रिड योजना आहे तरी काय?

Marathi News Live Updates : माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध, संसदीय समितीचा अहवाल समोर

Iphone update: भारतात लाँच होणार Apple Pay; iphone युजर्सना मिळणार 'टॅप अँड पे' सुविधा!

Ajinkya Rahane निवृत्तीनंतर घेणार 'फ्रेश गार्ड'; भारत-श्रीलंका मालिकेतून करणार नवी सुरुवात!

Maharashtra Kashmir Partnership: महाराष्ट्र–काश्मीर फलोत्पादन भागीदारीला नवी चालना; द्राक्ष-सफरचंद तंत्रज्ञान देवाणघेवाणीतून शेतकऱ्यांच्या विकासाला गती

SCROLL FOR NEXT