corona_204_3.jpg
corona_204_3.jpg 
देश

देशात कोरोनाचे थैमान; 24 तासांत सर्वाधिक 89,129 नवे रुग्ण, तब्बल 714 जणांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली- भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात दररोज विक्रमी रुग्णांची नोंद होत आहे. देशात एका दिवसांत कोरोनाच्या 89,129 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. परंतु, सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात 24 तासांत कोरोनामुळे 714 जणांचा मृत्यू झाला आहे. 

याचदरम्यान, देशभरात 44,202 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आता देशात कोरोनाचे एकूण 1 कोटी 23 लाख 92 हजार 260 प्रकरणे आहेत. यातील 1 कोटी 15 लाख 69 हजार 214 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात कोरोनाचे 6 लाख 58 हजार 909 सक्रिय रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा 1 लाख 64 हजार 110 पर्यंत पोहोचली आहे. 

आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासांत ज्या 714 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकट्या महाराष्ट्रात 481 रुग्ण, पंजाब 57, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये 16, केरळ आणि दिल्ली 14 आणि तमिळनाडूतील 12 रुग्णांचा समावेश होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाचे 89,129 नवे रुग्ण समोर आले. यात महाराष्ट्रातील 47913, कर्नाटक 4991, छत्तीसगडचे 4174, दिल्ली 3954 आणि तमिळनाडूच्या 3290 रुग्णांचा समावेश आहे. 

मागील एक आठवड्यात दररोज समोर येणाऱ्या प्रकरणात वाढ दिसून येत आहे. एक आठवड्यापूर्वी 28 मार्चला एका दिवसांत 62,714 नवे प्रकरणे समोर आली होती. 29 मार्चला हा आकडा वाढून 68,020 इतका झाला. 30 मार्चला 56,211, 31 मार्चला 53,480, एक एप्रिलला 72,330 आणि 2 एप्रिलला म्हणजे शुक्रवारी हा आकडा 81,466 झाला. ही आकडेवारी पाहता कोरोनाची दुसरी लाट हानीकारक ठरण्याची शक्यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT