Nag Missile 
देश

'आत्मनिर्भर भारत'; अँटी-टँक गाइडेड मिसाइल 'नाग'ची चाचणी यशस्वी

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारत आता शस्त्रास्त्रांच्या बाबतीत सुसज्ज देश बनत असल्याचे दिसून येत आहे. राफेल विमानांच्या आगमनानंतर आता मिसाईल क्षेत्रातही भारताने आपली घौडदौड सुरु ठेवली आहे. कारण, मिसाईल परिक्षणाच्या क्षेत्रात भारताने आता आणखी एक मोठी झेप घेतली आहे. 

भारताने गुरुवारी वारहेडसोबत एँटी-टँक गायडेड मिसाईल 'नाग'च्या शेवटच्या टप्प्याचे यशस्वी परिक्षण केले आहे. या मिसाईलची निर्मिती Defence Research and Development Organisation ने अर्थात डीआरडीओने केली आहे. या मिसाईलचे परिक्षण सकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी राजस्थानच्या पोखरण फायरिंग रेंजमध्ये केलं गेलं. अलिकडेच भारताने सुपरसोनिक, हायपरसोनिकसहित वेगवेगळ्या क्षमतेच्या मिसाईलचे परिक्षण केलं आहे. सीमेवर चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या मिसाईलचे परिक्षण महत्वपूर्ण मानले जात आहे. काही दिवसांपूर्वीच डीआरडीओच्या प्रमुखांनी म्हटलं की, भारतीय सैन्याला ज्याप्रकारच्या मिसाईलची अपेक्षा आहे त्याचप्रकारचे मिसाईल डीआरडीओकडून त्यांना पुरवले जाईल. मिसाईल निर्मितीच्या क्षेत्रात आता भारत आत्मनिर्भर बनला असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं. 

गेल्या अडीच महिन्यामध्ये डीआरडीओने जवळपास 12 मिसाईल्सचे परिक्षण केले आहे. हे सगळे मिसाईल वेगवेगळे असून वेगवेगळ्या मारक क्षमतेचे आहेत. असं म्हटलं जातंय की डीआरडीओ येत्या काही दिवसांतच मिसाईल्सचे टेस्टींग करणार आहे. गेल्या सात सप्टेंबर रोजी डीआरडीओने हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डिमॉनस्ट्रेटर व्हेहीकलचेही यशस्वी परिक्षण करण्यात आले होते. 

ही मानवविरहीत स्क्रॅमजेट व्हेहीकल मिसाईल आवाजाच्या गतीने सहापट वेगाने उड्डान करु शकते. या टेक्नोलॉजीच्या यशस्वी परिक्षणानंतर भारत हायपरसोनिक मिसाईल आणि इतर हत्यारांना सहजतेने विकसित करु शकेल. ही टेक्नोलॉजी मोजक्याच देशांकडे उपलब्ध आहे. आता या देशांत भारत देखील सामिल झाला आहे. 22 सप्टेंबर रोजी भारताने लेजर गाईडेड एँटी टँक गाईडेड मिसाईलच्या अर्जून टँकचे यशस्वी परिक्षण केले. याची मारक क्षमता तीन किलोमीटर आहे. यानंतर एक ऑक्टोबर रोजी या मिसाईलचे आणखी एक परिक्षण पार  पडले होते.

गेल्या 24 सप्टेंबर रोजी भारताने अण्वस्त्र घेऊन जाणाऱ्या पृथ्वी-2 मिसाईलचे यशस्वी परिक्षण केले. आता हे मिसाईल 400 किलोमीटरपर्यंतचा मारा करु शकते. तर तीस सप्टेंबर रोजी ब्रह्मोसचे यशस्वी परिक्षण झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT