India successfully tests Agni-4 missile India successfully tests Agni-4 missile
देश

Agni-4 Missile : भारताने घेतली अग्नी-४ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारताने (India) अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम असलेल्या अग्नी-४ (Agni-4) या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. अग्नी-४ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी सोमवारी (ता. ६) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर केल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या नेतृत्वाखाली ही चाचणी घेण्यात आली. (India successfully tests Agni-4 missile)

अग्नी-४ (Agni-4) ची रेंज ४,००० किमी आहे. प्रक्षेपणाने सर्व ऑपरेशनल पॅरामीटर्स तसेच संरक्षण प्रणालीची विश्वासार्हता सत्यापित केली आहे. ही यशस्वी चाचणी भारताच्या (India) विश्वसनीय किमान प्रतिबंध क्षमतेच्या धोरणाची पुष्टी करते. अलीकडेच भारतीय नौदलाने ‘सीकिंग हेलिकॉप्टर’मधून स्वदेशी बनावटीच्या पहिल्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती.

ओडिशातील बालासोर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी (ITR) येथे ही चाचणी घेण्यात आली. त्याचवेळी भारतीय नौदल आणि अंदमान निकोबार कमांडने संयुक्तपणे ‘सुपरसॉनिक क्रूझ’ क्षेपणास्त्र ब्रह्मोसच्या जहाजविरोधी आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली.

अग्नी क्षेपणास्त्रांच्या मालिकेतील हे चौथे क्षेपणास्त्र आहे. यापूर्वी ते अग्नी-II प्राइम म्हणून ओळखले जात होते. हे डीआरडीओद्वारे डिझाइन केलेले आहे आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडद्वारे निर्मित आहे. या क्षेपणास्त्राचे एकूण वजन १७ हजार किलोमीटर आणि लांबी २० मीटर आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Ceasefire : अमेरिका- इराण युद्धाविरामामुळे भारताला दिलासा; हॉर्मूझची सामुद्रधुनी खुली होताच एलपीजी पुरवठा होणार सुरळीत

Sports News: पलक-मुकेश नेलावल्ली यांची विश्वविक्रमासह सुवर्ण झेप; भारताचा अभिमान उंचावला

दिंडोरीवर पुन्हा शोककळा! चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, तर झोक्याचा फास लागून एकाचा अंत

अमेरिकेची २ आठवडे युद्धबंदी! पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं कॉपी पेस्ट ट्विट; स्क्रीप्ट ट्रम्पनी लिहून दिली?

Sports News: आशियाई बॅडमिंटन स्पर्धा;भारताचे दुहेरीत संमिश्र यश

SCROLL FOR NEXT