India plans global partnerships with 40 countries to boost textile exports and safeguard the apparel industry against US trade pressure. sakal
देश

India textile export plan: ट्रम्प यांना भारताचं सडेतोड प्रत्युत्तर! आता अमेरिका वगळता ‘या’ ४० देशांशी करणार संपर्क

India’s Response to US on Textile Trade : कपड्यांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारत सरकारने ४० देशांशी संपर्क साधण्याची योजना आखली आहे, कारण..

Mayur Ratnaparkhe

india in global textile markets : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त कर लादला आहे, त्यानंतर भारताने या करातून मार्ग काढण्यासाठी एक योजना आखली आहे. कापड उद्योग वाचवण्यासाठी आणि कपड्यांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारत सरकारने ४० देशांशी संपर्क साधण्याची योजना आखली आहे. कारण, प्रत्यक्षात, ट्रम्प यांच्या टॅरिफचा भारतातील कापड उद्योगावर सर्वात जास्त परिणाम होणार आहे. ज्याचा सामना करण्यासाठी भारताने आपला आराखडा तयार केला आहे.

अशा परिस्थितीत,या देशांशी विशेष संपर्क साधण्याचा हा उपक्रम बाजारपेठ विविधीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा पाऊल ठरणार आहे. अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर लादलेले अतिरिक्त २५ टक्के शुल्क २७ ऑगस्टपासून लागू झाले आहे. या क्षेत्रांच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

या उपक्रमांतर्गत ब्रिटन, जपान, दक्षिण कोरिया, जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, मेक्सिको, रशिया, बेल्जियम, तुर्की, नेदरलँड्स, पोलंड, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या प्रमुख देशांचा समावेश करण्यात आला आहे.

तर एका शासकीय अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत या ४० बाजारपेठांमध्ये कापड उत्पादनांचा विश्वासार्ह, दर्जेदार, शाश्वत आणि नाविन्यपूर्ण पुरवठादार बनण्यासाठी काम करेल. भारतीय मिशन आणि निर्यात प्रोत्साहन परिषदा यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील." याशिवाय जरी भारत आधीच २२० हून अधिक देशांमध्ये कापड निर्यात करतो, तरी हे ४० देश एकत्रितपणे सुमारे ५९० अब्ज डॉलर्स किमतीचे जागतिक कापड आणि कपडे आयात करतात. या आयातीत भारताचा वाटा सध्या पाच ते सहा टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

Mumbai: एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण! आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा सुटणार

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

SCROLL FOR NEXT