covid 19 
देश

भारतात ‘इबोला’चं औषध ‘कोरोना’वर वापरणार 

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. 4 : चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसवर अद्याप लस सापडलेली नाही. सध्या तरी कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव उपाय आहे. मात्र यातही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान जगासमोर आहे. कोरोनावर प्रभावी औषध किंवा लस नसल्याने त्यामुळे होणारे मृत्यू रोखणे हे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान बनले आहे.

कोरोनावर ठोस औषध येईपर्यंत इतर संसर्गजन्य आजारांवर उपलब्ध औषधांचा त्याविरोधात वापर केला जात आहे. अमेरिकेत इबोलाच्या आजारावर वापरण्यात येणारे औषध भारतातील कोरोनाबाधित रुग्णांवरही वापरण्यात येणार आहे. अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले असून लाखोंचे बळी घेतले आहेत. 

अमेरिकेसह इतर देशांत संसर्गजन्य आजारांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘रेमडेसिव्हीर’ या औषधामुळे कोरोना रुग्णांमध्ये सुधारणा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतात लवकरच कोरोना रुग्णांवर आपत्कालिन उपचारांसाठी या औषधाचा वापर करण्यात येईल. अमेरिकेतील गिलियड सायन्स या कंपनीने हे औषध तयार केले आहे. 

संसर्ग थांबला नाही, उलट अर्थव्यवस्था उद्धवस्थ झाली; 'या' प्रसिद्ध उद्योगपतीची टीका
 
कोरोनाची लक्षणे 
कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याच्या लक्षणांमध्ये सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, घसा दुखी, श्वास घेण्यास त्रास, फुप्फुसांना सूज यांचा समावेश आहे. ज्यांची प्रतिकार प्रणाली कमी आहे त्यांच्यावर कोरोनाचा जास्त परिणाम झालेला आढळतो.

इबोलाची लक्षणे
रोगात अचानक ताप येणे, प्रचंड थकवा येणे, स्नायू दुखणे तसेच घसा सुजणे ही लक्षणे दिसून येतात. नंतर रुग्णाला उलट्या व जुलाब होतात. अंगावर पुरळ येते. मुत्रपिंड व यकृताचे कार्य बिघडते. काही रुग्णांमध्ये रक्तस्त्राव होतो. इबोला हा विषाणू प्रथम 1976 मध्ये सुदान व कांगो भागातील इबोला नदीकाठी सापडला म्हणून हे नाव पडले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत एलावेनिल वलारिवानने जिंकलं रौप्य पदक

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT