देश

Owaisi on Ind vs Pak Cricket match: भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचवरून आता ओवैसीचा संसदेत मोदींना सवाल, म्हणाले..

Owaisi Parliament Statement : आज संसदेत पहलगाम हल्ल्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूर वरून जोरदार हंगामा झाल्याचे पाहायला मिळाले.

Mayur Ratnaparkhe

Owaisi’s Bold Statement in Parliament Over India-Pakistan Match : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ओवैसी म्हणाले, 'पंतप्रधान मोदींनी स्वतः म्हटले होते की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत. मग बैसरन खोऱ्यात लोक मारले गेल्यानंतरही सरकार भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना कसे होऊ देऊ शकते?'

ओवैसी यांनी पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या व्यापार बंदीचा संदर्भ प्रश्न केले की, 'जर त्यांच्या बोटी आपल्या  जलहद्दीत येऊ शकत नाहीत, तर तुम्ही क्रिकेट सामना कसा खेळू शकतात? त्यांनी सरकारला विचारले की जेव्हा तुम्ही रक्त आणि पाण्याच्या तत्त्वावर ठाम आहात, तर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचे धोरण कसे न्याय्य ठरू शकते?

याशिवाय ओवैसी म्हणाले, 'बैसरन खोऱ्यात जीव गमावलेल्या लोकांसाठी सरकारचा विवेक जागृत झाला नाही का? तुम्ही व्यापार थांबवला, त्यांच्या बोटी आपल्या पाण्यात येऊ शकत नसतील, तर मग तुम्ही कोणत्या तोंडाने क्रिकेट खेळणार? माझा विवेक मला तो सामना पाहू देत नाही.'

त्यांनी सरकारला विचारले की, आपल्या सीमेत घुसून नागरिकांची हत्या करणाऱ्या चार जणांसाठी कोणाला जबाबदार धरायचे? तसेच ओवैसी म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये समन्वयाचा मोठा अभाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: ''आता बास करा.. खूप मार बसला'' भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पाकिस्तानचे डीजीएमओ काय म्हणाले होते? मोदींनी सांगितलं

''ऑपरेशन सिंदूर' थांबवण्यासाठी मला कुणीही फोन केला नाही, अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचा फोन आला तेव्हा..'' मोदींनी लोकसभेत सांगितला किस्सा

PM Modi Parliament : ‘’ज्यांना भारताची बाजू दिसत नाही त्यांना मी...’’ ; पंतप्रधान मोदींचा लोकसभेत थेट इशारा!

Rahul Gandhi: ''मोदींमध्ये हिंमत असेल तर...'', ट्रम्प यांचं नाव घेऊन राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

Latest Maharashtra News Updates: मुंबईवरील हल्ल्यानंतरही काँग्रेसने पाकिस्तानसोबत व्यापारी करार केले- मोदी

SCROLL FOR NEXT