indias approach to g20 presidency domestic focus on progress and development pm modi leadership esakal
देश

Manuscript in G20:ऋग्वेदातील हस्तलिखितांचा प्राचीन वारसा नेमका कोठे ठेवलाय? जी-२० परिषदेत वाढवणार भारताची शान

परिषदेच्या आधी सांस्कृतिक प्रदर्शनात भंडारकर ओरिएंटल रिसर्च इंस्टिट्युटमधून ऋगवेदाची एक हस्तलिखित दाखवण्यात येणार आहे.

Manoj Bhalerao

G-20 Summit: जी-२० शिखर परिषदेचं आयोजन यंदा भारताच्या नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं आहे. यावेळी 'कल्चरल कॉरिडॉर'हे प्राचीन गोष्टींचे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. या प्रदर्शनात भारतातर्फे ऋग्वेदाचे एक हस्तलिखित ठेवण्यात येणार आहे. हे हस्तलिखित भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील आहेत.

हस्तलिखिताबद्दल सांगताना भांडारकर संस्थेच्या अध्यक्षांनी माहिती दिली की, "ऋग्वेदातील हे हस्तलिखित ५ शतकांपुर्वीचे असून काश्मिरी भूर्जपत्रावर शारदा लिपीत कोरण्यात आले आहेत."

पुण्यामधील बीओआरआयच्या कार्यकारी बोर्डाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन म्हणाले की, "हे ऋगवेदातील सर्वात जुने हस्तलिखित आहेत, जे जसेच्या तसे आहे. हे हस्तलिखित मनुष्यांच्या आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणावर आधारित आहे. हे विचार जी-२० शिखर परिषदेचे ब्रीदवाक्य 'वसुधैव कुटुंबकम'ला अनुसरुन आहे.

ऋग्वेदात राजाला नियंत्रण करणाऱ्या दोन संस्थांचा उल्लेख या हस्तलिखितात करण्यात आला आहे. ऋग्वेदिक काळात दोन संस्था खूप लोकप्रिय होत्या. एक 'सभा' ज्यात ज्येष्ठ लोकांची आणि महिलांची समिती होती, दुसरी 'समिती' ज्याला सामान्य लोकांची सभा असे म्हणतात." (Latest Marathi News)

शिखराच्या सांस्कृतिक कॉरिडॉरमधील दुसरी कलाकृती ही दिल्लीतील एलबीएस संस्कृत विद्यापीठात असलेल्या प्राचीन विद्वान पाणिनीच्या अष्टाध्यायीची प्रत असेल. 'कल्चरल कॉरिडॉर' या प्रदर्शनात यूकेचा मॅग्ना कार्टा, अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा, आफ्रिकेतील प्रागैतिहासिक माणसाचे अवशेष आणि मानवी वारशाची इतर चिन्हे दाखवण्यात येणार आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT