Indian Air Force
Indian Air Force 
देश

लखनौ-आग्रा महामार्गावर उतरली लढाऊ विमाने

वृत्तसंस्था

लखनौ : लखनौ-आग्रा या महामार्गावर भारतीय हवाई दलाच्या 16 विमानांनी प्रथम लँडिंग करून उड्डाण करत पराक्रम केला. या विमानांमध्ये लढाऊ आणि मालवाहू विमानांचाही समावेश होता. त्यामुळे हवाई दलाला युध्दजन्य परिस्थितीत महामार्गाचा वापर करता येणार आहे.

युद्ध, आपत्कालीन परिस्थिती अथवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात हवाई दलाची सज्जता तपासण्यासाठी आज (मंगळवारी) हा सराव घेण्यात आला. विमाने उतरण्याची क्षमता असलेले एकूण बारा महामार्ग भारतात असून, आतापर्यंत केवळ दोनच महामार्गांची चाचणी झाली आहे. आज होणारी ही चाचणी मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली. 

या चाचणीमध्ये एएन-32 हे मालवाहतूक विमान, सहा सुखोई-30 विमाने, तीन जग्वार विमाने, सहा मिराज-2000 विमाने सहभागी झाली होती, असे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. हवाई दलाच्या सी-130 विमानातून गरुड कमांडो महामार्गावर उतरत चाचणीस सुरवात झाली. या कमांडोंनी शत्रू सैन्यावर आक्रमण करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यांच्यानंतर लढाऊ विमाने एका मागून एक येत महामार्गावर उतरून उड्डाण केले. एएन-32 हे मालवाहू विमानेनेही महामार्गावर उतरून उड्डाण केले. चाचणीच्या अखेरीस सी-130 विमान पुन्हा येऊन गरुड कमांडोंना घेऊन गेले.

दोन वर्षांपूर्वी मेमध्ये, आपत्कालीन परिस्थितीमध्ये महामार्गांवर विमाने उतरविण्याचा सराव म्हणून मिराज-2000 हे विमान यमुना महामार्गावर उतरविण्यात आले होते. त्यानंतर 2016 च्या नोव्हेंबरमध्ये आग्रा-लखनौ महामार्गावर हवाई दलाची सहा लढाऊ विमाने उतरविण्यात आली होती.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT