Indian American businessman Ajay Banga born in pune becomes the next World Bank president  
देश

World Bank : भारतीय वंशाचे अजय बंगा होणार जागतिक बँकेचे अध्यक्ष; पुणे शहराशी आहे 'हे' खास नातं

रोहित कणसे

भारतीय वंशाचे अजय बंगा हे जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष असणार आहेत. बुधवारी अजय बंगा यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची जागतिक बँकेने दिली आहे. मास्टरकार्ड इंक.चे माजी सीईओ बंगा याच्या नावाला गेल्या महिन्यात अध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून मान्यता मिळाली होती.

जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी जवळपास वर्षभरापूर्वी पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर आता बंगा हे 2 जून रोजी पदभार स्वीकारतील. दरम्यान जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अजय बंगा यांच्या उमेदवारीला भारताने देखील पाठिंबा दिला होता.

जन्म पुण्यात, शिमल्यातून घेतले शिक्षण

जागतिक बँकेचे अध्यक्ष आणि मास्टरकार्डचे माजी सीईओ अजय बंगा यांचे शिमल्याशी जुने संबंध आहेत. मात्र त्यांचे महाराष्ट्रातील पुण्याशी खास नाते आहे. कारण बंगा यांता जन्म हा पुण्यात झाला आहे. पुणे शहरात जन्मलेल्या बंगा यांनी 70 च्या दशकात शिमल्यातील सेंट एडवर्ड स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले. त्याचे वडील सैन्यात अधिकारी होते. यादरम्यान ते काही काळ शिमल्यात तैनात होते. यादरम्यान अजय बंगा यांना सेंट एडवर्ड स्कूल शिमला येथे अभ्यासासाठी दाखल करण्यात आले.

अनेक दिग्गजांनी दिला पाठिंबा

63 वर्षीय अजय बंगा यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष म्हणून नामांकन दिले होते. समर्थनासाठी देण्यात आलेल्या खुल्या पत्रात, 55 वकील, शिक्षणतज्ज्ञ, अधिकारी, अनेक दिग्गज आणि माजी सरकारी अधिकारी यांनी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठीच्या नामांकनाला पाठिंबा दिला.

बंगा यांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये अनेक नोबेल विजेतेही होते. यामध्ये डॉ. जोसेफ स्टिग्लिट्झ (2001 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेले), डॉ. मायकेल स्पेन्स (2001 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते) आणि प्राध्यापक मुहम्मद युनूस (2006 चे नोबेल शांतता पुरस्कार विजेते) यांच्या नावांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

SCROLL FOR NEXT