Jammu and Kashmir Kupwara esakal
देश

Indian Army : कुपवाडात मोठी दुर्घटना; भूस्खलनामुळं JCO अधिकाऱ्यासह 3 जवानांचा दुर्दैवी मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात (Jammu and Kashmir Kupwara) आज (बुधवार) सकाळी एक मोठी दुर्घटना घडलीये.

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात (Jammu and Kashmir Kupwara) आज (बुधवार) सकाळी एक मोठी दुर्घटना घडलीये. कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LOC) गस्त घालत असताना खोल दरीत पडून एका अधिकारीसह (JCO) तीन सैनिकांचा मृत्यू झाला.

भारतीय लष्करानं (Indian Army) या अपघाताबाबत सांगितलं की, नियमित गस्तीदरम्यान हे जवान अपघाताचे बळी ठरले आहेत. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील माछिल सेक्टरमध्ये खोल दरीत पडल्यामुळं एक कनिष्ठ आयोग अधिकारी (JCO) आणि दोन सैनिकांचा मृत्यू झाला. जेसीओ आणि इतर दोन जवान माछिल सेक्टरमध्ये नियमित गस्त घालत असताना तिघंही खाली दरीत कोसळले, त्यात त्यांचा मृत्यू झाला.

जवानांचे मृतदेह काढले बाहेर

श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्सनं ट्विट केलंय की, "दुर्गम भागात नियमित गस्त घालत असताना एक जेसीओ आणि इतर दोन जवान बर्फातून पाय घसरुन खोल दरीत कोसळले आणि यात त्यांचा मृत्यू झाला. या तिन्ही जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, यापूर्वी गेल्या वर्षी 18 नोव्हेंबरला माछिल सेक्टरमध्ये अशीच घटना घडली होती. हिमस्खलनात तीन लष्करी जवानांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT