देश

एका दिवसाचा पगार 48 कोटी रुपये! कोण आहे तो भारतीय?

सध्या अशा एका भारतीय व्यक्तीची चर्चा सुरु आहे ज्याचा महिन्याचा पगार ऐकून आपल्याला भोवळ आल्याशिवाय राहणार नाही.

युगंधर ताजणे

मुंबई - सर्वसामान्य माणसाचा पगार किती चाळीस हजार, पन्नास हजार, आय टीमध्ये कामाला असणाऱ्याचा पन्नास फार तर लाखभर मात्र यापेक्षाही जास्त पगार कमविणाऱ्यांची संख्या कमी नाही. सध्या अशा एका भारतीय व्यक्तीची चर्चा सुरु आहे ज्याचा महिन्याचा पगार ऐकून आपल्याला भोवळ आल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या व्यक्तीला एवढा पगार कसा असू शकतो असा प्रश्न त्या व्यक्तीकडे पाहिल्यावर आपल्याला वाटल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियावर सध्या या व्यक्तीची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्यानं अनेकांचे लक्षही वेधून घेतले आहे. आपणही अशा भारतीय व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत. ज्याचा पगाराचा आकडा तब्बल 1458 कोटी रुपये आहे.

दर महिन्याला 1 हजार 458 कोटी रुपये कमविणाऱ्या त्या भारतीय व्यक्तीनं आता अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. जगातला सर्वात मोठा पगारदार हा भारतीय आहे. त्यांचे नाव जगदीप सिंग असे आहे. हा व्यक्ती अॅलन मस्कपेक्षाही जास्त पगार घेणारा आहे. जगदीप हे क्वॉन्टम स्केप कंपनीचे संस्थापक आहे. कंपनीचे सीईओ म्हणून सर्वाधिक पगार घेणारे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा एक दिवसाचा पगार ४८ कोटी रुपये आहे. म्हणजे त्यांचा एक दिवसांचा पगार हा अनेक कंपन्यांची वार्षिक उलाढाल आहे. जगातील अग्रगण्य कंपन्यांच्या सीईओपदी भारतीय आहे. त्यामुळे आता जगातील सर्वाधिक पगार घेण्याचा मान हा एका भारतीय व्यक्तीला मिळाला आहे. त्यांच्यावर सोशल मीडियावरुन कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे.

जगातील सर्वात मोठा पगारदार म्हणून सध्या सिंग यांची चर्चा आहे. वर्षाला 17 हजार 500 कोटींचे पॅकेज त्यांना मिळाले आहे. इलेक्ट्रीक कारच्या बॅटरी संशोधनाचे काम त्यांची कंपनी करते. जगदीप सिंग हे स्टॅनफोर्ड विद्यापीठातून ते बी टेक झाले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांनी मोठमोठी पदं भूषविली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : कोल्हापुरात खासगी बसला भीषण आग; आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT