K. Chandrasekhar Rao esakal
देश

भारताचं संविधान बदलण्याची गरज : के चंद्रशेखर राव

सकाळ डिजिटल टीम

'बाबासाहेबांनी संविधान लिहून दुर्बल घटकांचं कल्याण केलंय.'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही हनुमंत राव यांनी (V Hanumantha Rao) तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांना भारतीय संविधानाच्या (Indian Constitution) पुनर्लेखनाबाबत केलेलं विधान मागं घेण्याचं अल्टिमेटम दिलंय. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस नेते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी दलित बंधू योजना सुरू केली आणि सरकार दलित कुटुंबाला 10 लाख देणार असल्याचं सांगितलं. मात्र, त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळं दलितांमध्ये प्रचंड रोष पहायला मिळतोय.

हनुमंत राव पुढे म्हणाले, बाबासाहेबांनी (Babasaheb Ambedkar) संविधान लिहून दुर्बल घटकांचं कल्याण केलं. परंतु, एकीकडं केसीआर आंबेडकरांचा 124 फुटांचा पुतळा बनवायचं ध्येय बाळगतंय आणि दुसरीकडं त्यांना संविधान बदलायचंय. यापूर्वी त्यांनी 13 एप्रिल 2019 रोजी हैदराबादमधील (Hyderabad) पंजागुट्टा चौरास्ता येथे आंबेडकरांचा पुतळा (Ambedkar statue) बसवला होता.

संविधानाच्या कलम 3 मुळं आम्हाला तेलंगण मिळालं. संविधान बदलाची भाषा करुन केसीआर मोठी चूक करत आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळं लोक प्रचंड संतापले आहेत. चंद्रशेखर राव यांनी त्यांचं विधान मागं घ्यावं, अन्यथा आम्हाला मोठं आंदोलन उभारावं लागेल, असा इशारा त्यांनी दिलाय. भारताच्या संविधानाचं पुनर्लेखन करण्याची वेळ आलीय. जगातील अनेक देशांनी आपल्या राज्यघटनेत बदल केले आहेत, त्याचप्रमाणं आपल्या देशातही तसं व्हायला हवं, असं चंद्रशेखर राव यांनी म्हंटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT