Amit Shah on Ukraine Russia Issue Impact Assembly Polls  esakal
देश

'ऑपरेशन गंगा' चा विधानसभा निवडणुकांवर सकारात्मक परिणाम - अमित शाह

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : गेल्या जानेवारीपासून मोदी सरकार (Modi Government) युक्रेन आणि रशियामधील (Ukraine Russia War) परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा (Operation Ganga) राबवण्यात आले. याचा विधानसभा निवडणुकांवर (Assembly Polls) सकारात्मक परिणाम होणार आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणाले.

केंद्र सरकारने युक्रेन संकटातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू आहे. त्याचा मतदानावर काय परिणाम होऊ शकतो? असा सवाल विचारला असता अमित शाह बोलत होते.

केंद्र सरकार जानेवारीपासून युक्रेनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत तत्काळ निर्णय घेतलले आहेत. रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारीला आक्रमण केले. पण, सरकारने युक्रेनमधील भारतीयांसाठी १५ फेब्रुवारीलाच एक सल्लागार पाठवला होता. आतापर्यंत १२ हजारांपेक्षा अधिक भारतीय नागरिक मायदेशी परतले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या उर्वरीत भारतीयांसाठी आणखी काही विमाने पाठवण्यात आली आहेत. या प्रक्रियेचा निवडणुकांवर आणि लोकांवर देखील सकारात्मक परिणाम होत आहे, असं अमित शाह म्हणाले. रशियन लष्करी कारवाईमुळे २४ फेब्रुवारीपासून युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले असून, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना रोमानिया, हंगेरी, स्लोव्हाकिया आणि पोलंड यांसारख्या शेजारील देशांद्वारे एअरलिफ्ट केले जात आहे, असंही शाह यांनी सांगितलं.

दरम्यान, युद्धग्रस्त युक्रेनमधून विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारने राबवलेल्या मोहिमेचा वापर मोदी सरकार निवडणुकीच्या प्रचारासाठी करत असल्याचा आरोप केला जात आहे. संकटात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा वापर प्रचारासाठी होत आहे. त्यांना 'पंतप्रधान मोदी जिंदाबाद' असे नारे लावण्यास सांगतिले जात आहे, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

'मुंबई फक्त परप्रातियांमुळे, नाहीतर मराठी लोकांची परिस्थिती बिकट' प्रसिद्ध अभिनेत्रीच वादग्रस्त वक्तव्य, ट्रोल होताच मागितली माफी

उत्तर भारतात पुन्हा विमान अपघाताची शक्यता? ज्योतिषाचार्यांनी शेअर मार्केटचं ही वर्तवलं भविष्य

Latest Maharashtra News Updates : हिंजवडीमध्ये १८ तासांपासून बत्ती गूल

M S Dhoni Video : मोजक्या मित्रांसह धोनीने साजरा केला ४४वा वाढदिवस, माहीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ पाहाच..

SCROLL FOR NEXT