military 
देश

आरोग्य सेतू अॅपच्या वापराबाबत लष्कराने केली महत्वाची सूचना 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, आरोग्य सेतू अॅप वापरताना खबरदारी घेण्याची सूचना भारतीय लष्कराने जवानांना केली आहे. कार्यालयीन वेळेत, मोहीमेवर असताना तसेच संवेदनशील ठिकाणी या अॅपचा वापर करु नका अशा सूचना दिल्याचे वृत्त आयएएनएसने दिले आहे. 

आरोग्य सेतूच्या अॅपच्या माध्यमातून तुमच्या नजीक कोणी कोरोना संशयित व्यक्ती आल्यास तुम्हाला इशारा दिला जातो. त्यासाठी तुमच्या मोबाईलमधील जीपीएस आणि ब्लूटूथ सुरु ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही कोरोनाबाधित व्यक्ती अथवा परिसराच्या जवळपास गेल्यास तुम्हाला इशारा दिला जातो. त्याशिवाय प्रश्नावलीच्या माध्यमातून तुम्हाला कोरोनाचे लक्षण आहेत की नाही याबाबतही माहिती दिली जाते. त्यासाठी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित आहे. 

मात्र आरोग्य सेतू अॅपच्या वापराबाबत भारतीय जवानांना काही महत्वपूर्ण सूचना केली आहे. अॅपचा वापर करताना जवानांनी आपली ओळख, हुद्दा आदींबाबत माहिती न देण्याच्या सूचना केल्या आहे. या अॅपचा वापर करताना सायबर सुरक्षा नियमावलीची पूर्ण अंमलबजावणी करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी तैनात असलेल्यांनी अॅप वापरताना जीपीएस लोकेशन तसेच ब्ल्यूटूथ बंद करण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर हा अॅप डाऊनलोड करतानाच मोबाईलमध्ये अँटीव्हायरस असल्याची खात्री करून घेण्यास सांगितले आहे, तसेच मोबाईल अपडेट करण्यासही सांगितले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच त्यापासून खबरदारी घेण्यासाठी हा अॅप सुरु करण्यात आला आहे. आतापर्यंत एक कोटीहून अधिक लोकांनी तो डाऊनलोड केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT