INS garuda 
देश

नौदलाचं ऐतिहासिक पाऊल; युद्धनौकेवर पहिल्यांदाच महिला अधिकारी तैनात

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- भारतीय सैन्यदलातही आता महिलांचा सहभाग वाढवण्यात येत आहे. स्त्री - पुरुष समानतेच्या दिशेने पुढे जाताना भारताच्या नौदलाने ऐतिहासिक पाऊल उचललं असून आपल्या युद्धनौकेच्या सदस्यांमध्ये पहिल्यांदाच दोन महिलांचा समावेश केला आहे. सब लेफ्टनंट कुमुदीनी त्यागी आणि सब लेफ्टनंट रीती सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच युद्धनौकेवर तैनात करण्यात आले आहे. नौदलामध्ये अनेक महिला उच्चपदावर आहेत. मात्र, त्यांना कधीही दिर्घकाळासाठी युद्धनौकेवर तैनात करण्यात आलं नव्हतं. सदस्यांच्या राहण्यासाठी असलेल्या क्वार्टर्समध्ये खाजगीपणाचा अभाव आणि युद्धनौकेत पुरुषांना ग्रहीत धरुन बनवण्यात आलेल्या बाथरुम सुविधा यासाठी येथे महिलांना तैनात केलं जात नव्हतं.

नौदलात नव्याने दाखल झालेल्या या महिला अधिकाऱ्यांमुळे बदल घडणार आहे. नौदलातील अनेक कामांसाठी उपयोगी पडणारी हेलिकॉप्टर्स जी सोनार कॉन्सोल अँड इंटिेलिजन्स, सर्व्हिलन्स आणि रिकॉइन्सेससाठी वापरली जातात त्यांना चालवण्यासाठी दोन्ही महिला अधिकारी प्रशिक्षण देतील. दोन्ही नौसेनेच्या एमएच 60 आर हेलिकॉप्टरमधून उड्डाण करतील असं म्हटलं जात आहे. या हेलिकॉप्टर्सचा उपयोग शत्रूच्या जहाजांचा आणि पाणबुड्यांचा शोध घेण्यासाठी केला जातो. ही अशी जहाजे किंवा पाणबुड्या असतात ज्यामध्ये मिसाइल किंवा टोर्पेडोस लावलेले असतात. 2018 मध्ये तत्कालिन संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांनी 2.6 बिलियन डॉलर्समध्ये हेलिकॉप्टरच्या खरेदीला मंजुरी दिली होती.

एकीकडे भारतीय हवाई दलाने राफेल या लढाऊ विमानांच्या ताफ्यात काम करण्यासाठी महिला पायलटची यादी तयार केली असतानाच आता जहाजांवरही महिला अधिकारी तैनात केल्याची बातमी समोर आली. दरम्यान, हवाई दलाच्या महिला पायलटची यादी अधिकृत कधी जाहीर केली जाईल किंवा त्यांना अंबाला इथल्या आयएएफच्या गोल्डन अॅरो स्क्वाड्रनसोबत कार्यरत करण्याची घोषणा केली जाईल याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. गोल्डन अॅरो स्क्वाड्रन ही भारतीय हवाई दलातील पहिलं स्क्वाड्रन आहे जे फ्रान्सने तयार केलेल्या राफेल विमानांचे उड्डाण करणार आहे. 

2016 मध्ये फ्लाइट लेफ्टनंतर भावना कांत, फ्लाइट लेफ्टनंतर अवनी चतुर्वेदी, फ्लाइट लेफ्टनंट मोहना सिंग या पहिल्या भारतीय महिला लढाऊ पायलट ठरल्या होत्या. सध्या भारताच्या हवाई दलात 1875 महिला असून यात 10 लढाऊ पायलट आहेत. तसेच 10 महिला अधिकारी नेव्हिगेटर असून त्यांना फायटर फ्लीटमध्ये तैनात केलं जाईल. तसंच सुखोईमध्ये वेपन्स सिस्टिम ऑपरेटर म्हणूनही काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT