भारतीय 'फेलुदा' देणार कोरोना टेस्टचा रिपोर्ट फक्त दोन तासात

Test
Test

नवी दिल्ली - जगभर वाढत असेलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटाला रोखण्यासाठी अनेक देशांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. जगात सध्या 100 हून अधिक लशींवर संशोधन सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे हे लवकर समजल्यास त्याच्याकडून इतरांना तो होण्याचा धोका टाळता येईल. यासाठीच भारतात आता स्वदेशी कोविड 19 टेस्ट किट विकसित करण्यात आलं आहे. फेलुदा असं नाव असलेल्या या टेस्ट किटच्या माध्यमातून अचूक आणि लवकर कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे की नाही हे ओळखता येणार आहे. या टेस्टमुळे कोरोना चाचणीचा अहवाल फक्त दोन तासात मिळतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने टाटा क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेस्ड शॉर्ट पालिंड्रोमिक रिपीट्स (CRISPR) यांना कोरोना चाचणी फेलुदाच्या व्यावसायिक लाँचसाठी परवानगी दिली आहे. सीएसआयआरने शनिवारी याबाबत माहिती दिली. सीएसआयआरने म्हटलं की, या कोरोना व्हायरसचा संसर्ग ओळखण्यासाठी एका स्वदेशी आणि अत्याधुनिक सीआरआयएसपीआर तंत्रज्ञानाचा उपोयग करण्यात आला आहे. 

टाटा CRISPR च्या तपासणीची अचूकता ही सध्याच्या आरटी पीसीआर तपासणी इतकीच आहे. मात्र यासाठी कमी वेळ आणि कमी खर्च लागतो. तसंच याचा वापरही सहज करता येतो. या तंत्रज्ञानाला सीएसआयआर - आयजीआयबीने तयार केलं आहे. 

फेलुदाबाबत मिळालेल्या माहितीनुसार 96 टक्क्यांपर्यंत अचूक अहवाल मिळतात. 

संशोधकांच्या म्हणण्यानुसार ही चाचणी अगदी प्रेग्नंन्सी टेस्टप्रमाणेच आहे. जर कोरोना व्हायरसचा संसर्ग असेल तर कागदाच्या स्ट्रिपवर रंग बदलतो. इंडियन काउंन्सिल फॉर मेडिकल रिसर्चनेसुद्धा भारतीय संशोधकांचं हे मोठं यश असल्याचं मानलं आहे.

भारताता कोरोनाबाधितांची संख्या 54 लाख 87 हजारांवर पोहोचली आहे. रविवारी एका दिवसात 86 हजार 961 नवे रुग्ण सापडले. तर 24 तासात 1130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 54 लाख 87 हजार 581 इतकी झाली असून देशात सध्या 10 लाख 3 हजार 299 सक्रीय रुग्ण आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे भारतातील रिकव्हरी रेट वाढत असून 43 लाख 96 हजार 399 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत देशात 87 हजार 882 जणांचा मृत्यू झाला आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com