Indian Navy Tracks Down Chinese Warships Close To Indian Ocean 
देश

भारताचा चीनला इशारा; नौदलाची अभिमानास्पद कामगिरी 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय सागरी हद्दीतील संपत्तीवर डोळा ठेवून असणाऱ्या चीनच्या समुद्रातील भारतविरोधी कारवाया वाढत चालल्या आहेत. मागील सप्टेंबर महिन्यामध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एका संशोधन करणाऱ्या जहाजाने अंदमान समुद्रातील भारताच्या अतिविशेष आर्थिक क्षेत्रामध्ये घुसखोरी केली होती. त्या जहाजाला भारतीय नौदलाने पिटाळून लावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आमच्या भागामध्ये घुसखोरी करणाऱ्या मंडळींनी भारतीय नौदलाचे अस्तित्व लक्षात घ्यावे, असा इशारा नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीरसिंग यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

चीनच्या जहाजाने भारताच्या आर्थिक विशेष क्षेत्रामध्ये घुसखोरी करण्यापूर्वी आमची परवानगी घेतली नव्हती, नियमानुसार एखाद्या तिऱ्हाईत व्यक्तीला आमच्या आर्थिक क्षेत्रात यायचे असेल तर त्याने आमची परवानगी घेणे गरजेचे आहे. चीनच्या शी यान-1 जहाजाने ही परवानगी घेतली नव्हती, असे भारताच्या नौदल अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोर्ट ब्लेअर बंदराजवळ या चिनी जहाजाच्या संशयास्पद कारवाया सुरू असताना भारताच्या सागरी सुरक्षा टेहळणी विमानाने त्यांच्या हालचाली टिपल्या होत्या, त्यानंतर नौदलाने घटनास्थळी धाव घेतली.

धक्कादायक पोलिस बलात्कार करत असताना दोघांचा पहारा

भारताला मिळणार युद्धनौका
नौदलामध्ये तीन विमानवाहू नौकांचा समावेश व्हावा यासाठी नौदलाने दीर्घकालीन नियोजन आखले असल्याचे नौदलप्रमुख ऍडमिरल करमबिरसिंग यांनी आज सांगितले. भारतीय बनावटीची महिली स्वदेशी युद्धनौका 2020 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होईल, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. ते आज येथे वार्षिक पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल पूर्ण सक्षम असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकतर्फी निकाल की धक्कादायक उलथापालथ? काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेचा फायदा कुणाला? अमरावती विधानपरिषदेचा आज फैसला

Industrial Pollution : कुरकुंभ एमआयडीसीतील ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’वर प्रदूषण प्रकरणी कडक कारवाई; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्पादन तत्काळ बंद करण्याचे आदेश

उत्तम गुंतवणूक : निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांक : गुंतवणुकीची आकर्षक संधी

Pune Traffic: बाबा भिडे पूल २२ जून ते ६ जुलैपर्यंत पूर्ण बंद; डेक्कन मेट्रो पादचारी केबल पुलाच्या कामासाठी वाहतूक बदल, पर्यायी मार्ग जाहीर

Pesarattu Recipe: प्रोटीनने भरपूर, चवीला जबरदस्त! आंध्र प्रदेशचा लोकप्रिय नाश्ता पेसरट्टू; एकदा खाल तर पुन्हा पुन्हा ट्राय कराल

SCROLL FOR NEXT