Indian Navy warship INS Sumitra has successfully carried out another anti piracy operation 
देश

Indian Navy Rescues: भारतीय नौदलाने 19 पाकिस्तानी नागरिकांना वाचवलं, हाणून पाडला चाचेगिरीचा प्रयत्न

Indian Navy: भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस सुमित्राने आणखी एक यशस्वी मिशन पार पाडलं आहे. इराणचा झेंडा असलेले एक मासेमारी जहाज सोमालीच्या किनाऱ्याकडे निघाले होते.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस सुमित्राने आणखी एक यशस्वी मिशन पार पाडलं आहे. इराणचा झेंडा असलेले एक मासेमारी जहाज सोमालीच्या किनाऱ्याकडे निघाले होते. यावेळी सोमालीच्या समुद्री चाच्यांनी या जहाजावर ताबा मिळवला होता. भारतीय नौदलाने या चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडला असून जहाजावर असलेल्या १९ पाकिस्तानी नागरिकांना वाचवलं आहे.(The Indian Navy warship INS Sumitra has successfully carried out another anti piracy operation)

गेल्या ३६ तासातील भारतीय नौदलाचे हे दुसरे यशस्वी मिशन आहे. FV Iman नावाचे इराणचा झेंडा असलेले मासेमारी करणारे जहाज सोमाली चाच्यांनी ताब्यात घेतले होते. यावर १७ कर्मचारी होते. पूर्व सोमालीया किनारा आणि गल्फ ऑफ एडनच्या दरम्यान भारतीय नौदलाने मोहीम राबवून चाच्यांना हुसकावून लावले होते. या जहाजाला पुन्हा रवाना करण्यात आले होते.

भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, इराणचा झेंडा असलेल्या एका मासेमारी जहाजावर सोमालियन चाच्यांनी ताबा मिळवला होता. जहाजावर असणाऱ्या १९ पाकिस्तानी कर्मचाऱ्यांना त्यांनी बंधक बनवलं होतं. नौदलाला माहिती मिळाल्यानंतर एसओपीनुसार मोहीम आखण्यात आली. त्यानंतर १९ पाकिस्तान नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. तसेच त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

इस्राइल-हमास युद्धाचा भडका उडाल्यापासून अरबी समुद्रात समुद्री चाच्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. काही भारतीय जहाजांवर देखील हल्ला झाला आहे. त्यानंतर भारताकडून या भागामध्ये गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच युद्धनौका तैनात करण्यात आली आहे. आयएनएस सुमित्राने गेल्या ३६ तासांत दुसरे यशस्वी मिशन पार पाडले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT