indian oil bought 3 million barrels of crude oil from russia at a huge discount  Falling crude oil prices
देश

भारताने रशियाकडून खरेदी केलं 30 लाख बॅरल कच्चं तेल; मिळाली 'इतकी' सूट

सकाळ डिजिटल टीम

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फायदा भारतीय तेल कंपन्यांना होताना दिसत आहे. तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने कच्च्या तेलाच्या सध्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीच्या तुलनेत मोठ्या सवलतीत रशियाकडून 30 लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केले आहे. सूत्रांनी ही माहिती दिली असून IOC ने ब्रेंटच्या तुलनेत 20 ते 25 डॉलर प्रति बॅरलच्या सवलतीने 'युरल्स क्रूड' खरेदी केले आहे.

रिपोर्टनुसार, अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी आर्थिक निर्बंध लादल्यानंतर रशियाने भारत आणि इतर मोठ्या आयातदारांना सवलतीच्या किमतीत तेल आणि इतर वस्तू देण्यास सुरुवात केली आहे. आयओसीने स्वतःच्या अटींवर रशियाकडून कच्चे तेल खरेदी केले आहे. यामध्ये भारतीय किनारपट्टीवर विक्रेत्याकडून कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यात येतो. मालवाहतूक आणि विमा व्यवस्थेतील निर्बंधांमुळे कोणतीही गुंतागुंत होऊ नये म्हणून ही अट घालण्यात आली होती.

कच्च्या तेलाची 85 टक्के गरज आयातीद्वारे भागवणाऱ्या भारताला कच्च्या तेलाची स्वस्त दरात खरेदी करून आपले ऊर्जा बिल कमी करायचे आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी राज्यसभेत सांगितले की, अपारंपरिक पुरवठादारांकडून इंधन खरेदी करण्यासाठी लागणारा विमा आणि मालवाहतूक खर्च यासारख्या बाबींचा विचार केल्यानंतरच सवलतीच्या किमतीत कच्च्या तेलाची विक्री करण्याच्या रशियाच्या प्रस्तावाचे देश मूल्यांकन करेल. विशेष म्हणजे भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी फक्त 1.3 टक्के रशियाकडून खरेदी करतो.

रशियावर अनेक देशांचे निर्बंध

सध्या अमेरिकेने भारताला हे देखील स्पष्ट केले आहे की जर ते रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करत असेल तर ते अमेरिकेच्या निर्बंधांच्या नियमांचे उल्लंघन करत नाही. युक्रेन संकटामुळे अमेरिका, जपानसह अनेक देशांनी रशियावर बंदी घातली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

Rinku Singh : देशासाठी रिंकू सिंग परतणार! वडिलांच्या अंतिम संस्कारानंतर तो कोलकात्यात संघात दाखल होणार, वेस्ट इंडिजला भिडणार...

SCROLL FOR NEXT