New IRCTC menu announced by Indian Railways, listing detailed food items and prices for train passengers in various classes.  esakal
देश

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

IRCTC Food Rates : जाणून घ्या, आता रेल्वे स्थानकावर आणि रेल्वेत किती रुपयांत काय मिळणार?

Mayur Ratnaparkhe

Indian Railways Introduces New Onboard Menu :भारतीय रेल्वे मंत्रालयाने आता रेल्वेतील जेवणासंबधीचं नवीन दरपत्रक जाहीर केलं आहे. भारतात दररोज कोट्यावधी लोक ट्रेनमध्ये प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना रेल्वेतील जेवणावर किंवा रेल्वे स्थानकावर मिळणाऱ्या अन्नपदार्थांवर अवलंबून रहावे लागते. अशावेळी प्रवशांची लूट होवू नये, या दृष्टीने रेल्वे मंत्रालयाने अन्नपदार्थांचे रेट ठरवले आहेत. रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावर शाकाहारी जेवणाची किंमत आणि त्याचा संपूर्ण मेनू शेअर केला आहे.

रेल्वे मंत्रालयाने माहिती दिली आहे की, रेल्वे स्टेशनवर उपलब्ध असलेल्या व्हेज मील (शाकाहारी जेवण)ची किंमत ७० रुपये आहे, तर ट्रेनमध्ये त्याची किंमत ८० रुपये असणार आहे. रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की व्हेज मीलच्या मेनूमध्ये साधा भात (१५० ग्रॅम), जाड डाळ किंवा सांबार (१५० ग्रॅम), दही (८० ग्रॅम), २ पराठे किंवा ४ रोट्या (१०० ग्रॅम), भाजी (१०० ग्रॅम) आणि लोणचेचे एक पॅकेट (१२ ग्रॅम) समाविष्ट आहे.

याशिवाय रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना असेही आवाहन केले आहे, की ठरलेल्या किंमतीपेक्षा जर तुमच्याकडून जास्त पैसे घेतले जात असतील तर तत्काल याबाबत तक्रार करावी, संबंधितावर कारवाई केली जाईल. एवढंच नाहीतर तुम्हाला दिलेल्या ‘व्हेज मील’मध्ये जर एखादा पदार्थ गायब असेल तर तुम्ही रेल्वे मंत्रालच्या हे ट्वीट दाखून त्याबाबत विचारणाही करू शकता.

तसेच, यानंतरही जर संबंधित कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला योग्य प्रतिसाद दिला गेला नाहीतर तुम्ही त्यांची रेल्वेकडे तक्रार करू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही रेल्वेचे अधिकृत X हॅण्डलर किंवा  रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ वर किंवा RailOne अॅपवर Rail Madad द्वारेही तक्रार देखील करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT