Corona Vaccination Sakal
देश

लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याबाबत धक्कादायक खुलासा

वैज्ञानिकांच्या सहमतीशिवाय हा निर्णय घेण्यात आला.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: लसींच्या ( covieshield vaccine) दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याच्या निर्णयासंदर्भात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या या कोरोना प्रतिबंधक लसींचे उत्पादन भारतात सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. भारत सरकारने लसींच्या दोन डोसमधील अंतर (dosing gap)दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. पण वैज्ञानिकांच्या सहमतीशिवाय हा निर्णय घेण्यात आला. सल्लागार समितीच्या तीन सदस्यांनी रॉयटर्सला ही माहिती दिली आहे. (indian scientists claim We didnt back doubling of vaccine dosing gap)

आरोग्य मंत्रालयाने १३ मे रोजी कोव्हिशिल्ड लसींच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरुन १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावेळी देशात लसींचा तुटवडा होता. मागणी इतका लसींचा पुरवठा होत नव्हता आणि देशभरात कोरोना संसर्गाचे प्रमाणही जास्त होते.

NTAGI च्या १४ वैज्ञानिकांपैकी तिघांनी अशी शिफारस करण्यासाठी पुरेसे पुरावेच नसल्याचे सांगितले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमोलॉजीचे माजी संचालक एम.डी. गुप्ते म्हणाले की, "NTAGI दोन डोसमधील अंतर ८ ते १२ आठवड्यांनी वाढवण्याचे समर्थन केले. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा दोन डोसमध्ये इतके अंतर ठेवण्याचा सल्ला दिला होता." पण १२ आठवड्यांनंतर लस दिल्यास त्याचे काय परिणाम होतील, याचा डाटा वैज्ञानिकांकडे उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.

"आठ ते बारा आठवडे आम्ही मान्य केलं. पण १२ ते १६ आठवडे हे अंतर सरकारकडून आलं आहे. हे योग्य सुद्धा असेल किंवा नसेल सुद्धा. त्या बद्दल आमच्याकडे माहिती नाही" असे गुप्ते यांनी सांगितलं. NTAGI मधील गुप्तेंचे सहकारी मॅथ्यू वर्गीस यांनी सुद्धा सहमती दर्शवली. वैज्ञानिकांच्या गटाने आठ ते १२ आठवड्यांची शिफारस केली होती.

वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारावर लसींच्या डोसमधील अंतरासंदर्भात निर्णय घेतला. NTAGI सदस्यांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोविडवर काम करणाऱ्या NTAGI कडून आलेल्या शिफारशीवरुन आम्ही लसींच्या दोन डोसमध्ये १२ ते १६ आठड्याच्या अंतराचा प्रस्ताव स्वीकारत आहोत, असे आरोग्य मंत्रालयाने १३ मे रोजी म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

SCROLL FOR NEXT