flight bengluru 
देश

अभिमानास्पद! 19 भारतीय महिला पायलटच्या पथकाने रचला इतिहास

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - एअर इंडियाच्या महिला पायलटच्या पथकाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. महिलांच्या पायलट टीमने उत्तर ध्रुवावरून जगातील सर्वात लांब पल्ल्याच्या हवाई मार्गावरून जाण्यासाठी उड्डाण केलं आहे. या महिला अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोतून 16 हजार किमी अंतर पार करून 9 जानेवारीला बेंगळुरूत पोहोचल्या आहेत. 16 हजार किलोमीटरचं अंतर उड्डाण करणाऱ्या या महिला पायलटच्या पथकाचं नेतृत्व कॅप्टन झोया अग्रवाल करत आहे.

एअर इंडियाकडून दिलेल्या माहितीनुसार, पायलट कॅप्टन झोया आणि त्यांच्या पथकाकडे हे काम सोपवण्यात आलं होतं. झोयाने 2013 मध्ये बोइंग 777 विमान उडवलं होतं. त्यावेळी बोइंग 777 विमान उड्डाण करणारी ती सर्वात तरुण महिला पायलट ठरली होती. यामुळेच यावेळच्या आव्हानात्मक अशा मोहिमेचं नेतृत्व तिच्याकडे दिलं होतं. 

कॅप्टन झोयाने म्हटलं की, जगातील अनेक लोक त्यांच्या आयुष्यात नॉर्थ पोल किंवा त्यांचा नकाशासुद्धा पाहू शकणार नाहीत. मी स्वत:ला नशीबवान समजते की आमच्या फ्लॅग कॅरिअरने माझ्यावर विश्वास ठेवला. नॉर्थ पोलवरून सॅन फ्रान्सिस्को आणि तिथून बेंगळुरूपर्यंत जगातील सर्वात लांब आणि बोइंग 777 मधून पहिल्या उड्डाणाचे नेतृत्व करण्याची सुवर्णसंधी आहे. 

महिला पायलटच्या टीमने ही कामगिरी करण्याची पहिलीच वेळ आहे. यामध्ये नॉर्थ पोलवरून जाण्याचा प्रवास रोमांचक असा होता. कारण नॉर्थ पोल पाहणं आणि तिथून जाणं अनेक प्रोफेशनल पायलटचं स्वप्न असतं. कोणतीही एअरलाइन कंपनी या मार्गावर त्यांच्या सर्वात अनुभवी पायलटना पाठवते.19 महिला पायलटचं हे स्वप्न पूर्ण झालं.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT