Vande Bharat Sleeper Train
India’s First Vande Bharat Sleeper Train Launched : भारतीय रेल्वे १७ जानेवारी रोजी त्यांची बहुप्रतिक्षित वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणार आहे. पहिली वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस हावडा (कोलकाता) ते कामाख्या (गुवाहाटी) दरम्यान अंदाजे ९५८ किलोमीटर धावेल आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना आधुनिक सुविधांसह जलद आणि आरामदायी प्रवास प्रदान करेल.
प्राप्त माहितीनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये थर्ड एसी, सेकंड एसी आणि फर्स्ट एसी क्लासचे डबे असतील, ज्यांचे भाडे निश्चत झाले आहे. हावडा ते कामाख्या पर्यंत थर्ड एसी (३एसी) भाडे २ हजार २९९ रुपये निश्चित करण्यात आले आहे. हावडा ते न्यू जलपाईगुडीचे भाडे १ हजार ३३४ रुपये आणि हावडा ते मालदा टाउनचे भाडे ९६० रुपये निश्चित करण्यात आले आहे. सेकंड एसी साठी हावडा ते कामाख्यासाठी भाडे २ हजार ९७० रुपये, तर हावडा ते न्यू जलपाईगुडीचे भाडे १ हजार ७२४ रुपये आणि हावडा ते मालदा टाउनचे भाडे १ हजार २४० रुपये असणार आहे.
रेल्वेकडे मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांना या निश्चित तिकीट भाड्यांव्यतिरिक्त ५ टक्के जीएसटी भरावा लागेल. याचा अर्थ तिकीट बुकिंगच्या वेळी निश्चित भाड्यापेक्षा एकूण देणं जास्त असतील.
रेल्वेने असेही स्पष्ट केले आहे की वंदे भारत स्लीपर ट्रेन ही प्रीमियम ट्रेन म्हणून वर्गीकृत आहे, ज्याची किमान भाडे मर्यादा ४०० किलोमीटर आहे. याचा अर्थ ४०० किलोमीटरपेक्षा कमी प्रवासासाठी तिकिटे उपलब्ध राहणार नाहीत. तथापि, ४०० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी भाडे वाढेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.